Home /News /entertainment /

रिंकू राजगुरूचा VIDEO पाहून एक चाहता झाला भलताच नाराज, म्हणाला असं काही.....

रिंकू राजगुरूचा VIDEO पाहून एक चाहता झाला भलताच नाराज, म्हणाला असं काही.....

रिंकू राजगुरू एक व्हिडिओ (Rinku Rajguru latest Video ) चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. चाहत्यांकडून तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. असं जरी असलं तरी एक चाहता मात्र रिंकूवर चांगलाच नाराज झाला आहे.

  मुंबई, 19 मे- सैराट फेम रिंकू राजगुरू (Rinku Rajguru ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. नुकताच तिनं तिचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं या व्हिडिओला सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. रिंकूचा हा व्हिडिओ (Rinku Rajguru latest Video ) चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. चाहत्यांकडून तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. असं जरी असलं तरी एक चाहता मात्र रिंकूवर चांगलाच नाराज झाला आहे. त्यांने कमेंट करत रिंकूवर नाराजी व्यक्त केली आहे. रिंकू राजगुरुनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नभ उतरु आला ..... हे मराठीतील गाणं रिंकूच्या या व्हिडिओच्या मागे वाजत आहे. तिचा हा दिलखुलास आणि तितकाच साधा अंदाज चाहत्यांना मात्र घायाळ करत आहेत. अनेकांनी तिच्या या साधेपणाची, सुंदरतेचे कौतुक केलं आहे. वाचा-Anand Remake: राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक रिंकूनं या व्हि़डिओला सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, तुम्हाला आनंदी आयुष्य हे शोधून मिळत नसतं तर ते आपणच आनंदी बनवायचं असतं...अशी काहीशी कॅप्शन तिनं या व्हि़डिओला दिली आहे. तिचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र एक चाहता नाराज झाला आहे. त्यांने म्हटलं आहे की, कमेंट करून काय फायदा.. एकदा माणूस फेमस झाला की फॅन्सना भाव पण नाही देत. बहुतेक रिंकूने त्याच्या कमेंटला रिप्लास न दिल्यामुळं तिचा चाहता तिच्यावर नाराज झाला आहे. आता रिंकू या चाहत्याला रिप्लाय देते का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. अनेकवेळा कलाकारांना चाहत्यांना रिप्लाय देणं शक्य नसते,त्यामुळं चाहते नाराज होत असतात. रिंकू राजगुरूचा जन्म सोलापूरमधील अकलुज याठिकाणी झाला आहे. तिचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. परंतु तिला रिंकूच म्हटलं जातं. रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. रिंकूने मराठीसोबत हिंदीमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे मेकअप, कागर आणि अलिकडेच आलेला 'झुंड' हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले.
  सध्या रिंकू आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. आधीमध्ये ती फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्रीने फारच कमी काळात स्वतःमध्ये मोठा बदल केला आहे. रिंकूचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क होतात. ती आधीपेक्षा जास्त स्लिम आणि फिट झाली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Rinku rajguru

  पुढील बातम्या