मुंबई,3 नोव्हेंबर- दिवाळीची (diwali)धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. मराठी अभिनेत्री देखील दिवाळीसाठी खास मराठमोळा साडी लुक चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta malli) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिवाळीनिमित्ताने चाहत्यांना एक खास मेसेज देत प्राजक्ताने काही साडीतील फोटो शेअर केले आहेत. सध्या प्राजक्ताच्या या मेसेजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे.
प्राजक्ताने हे फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने निळ्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत या दिवाळीला फटाके फोडू नका तर स्वत: फटाका बन, असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे. प्राजक्ताचा हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासोबतच या कॅप्शनची देखील चर्चा रंगलेली आहे.
This Diwali don’t burn a Patakha, Instead Be the Patakha . Thank you @tanyasbenzfashion for this lovely saree @ . .#prajakttamali @ pic.twitter.com/b1KHsmLEaP
— Prajjakta Malli (@prajaktamali) November 3, 2021
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलयचे तर ती सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करताना दिसक आहे. या शोमध्ये ती तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
वाचा : बिग बॉसच्या घरातील हे पाच स्पर्धक आहेत महेश मांजरेकरांचे मोस्ट फेव्हरेट!
तसेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राती हास्यजत्राच्या संपूर्ण टीमने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी प्राजक्ताने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. प्राजक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देखील शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials