मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: 'जिया लागे ना' प्रियाच्या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध; दिल्या अशा कमेंट्स...

VIDEO: 'जिया लागे ना' प्रियाच्या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध; दिल्या अशा कमेंट्स...

नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये प्रियाचा सुरीला अंदाज दिसून येत आहे.

नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये प्रियाचा सुरीला अंदाज दिसून येत आहे.

नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये प्रियाचा सुरीला अंदाज दिसून येत आहे.

मुंबई, 7 जुलै- मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) प्रिया बापटचा (Priya Bapat) सुरीला अंदाज पाहायला मिळत आहे. प्रिया मराठीमधील एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम गायिकादेखील असल्याचं या व्हिडीओवरून कळत आहे. प्रियाने नुकताच आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. त्यामध्ये ती ‘जिया लागे ना’ हे सुंदर गाणं सादर करत असल्याचं दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

अभिनेत्री प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री समजली जाते. तिने आजपर्यं विविध भूमिका साकारत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. प्रिया बापट सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. ती नेहमीच विविध पोस्ट शेयर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. प्रिया सतत आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या प्रत्येक पोस्ट चाहत्यांना खुपचं पसंत पडत असतात. तसेच तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा मिळत असतात.

(हे वाचा: ‘रात्री 2 वाजता दिलिपजींचा फोन आला, अन्..’; सचिन यांनी सांगितली खास आठवण)

नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये प्रियाचा सुरीला अंदाज दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये प्रिया ‘जिया लागे ना’ हे सुंदर गाणं म्हणताना दिसून येत आहे. तर खुपचं सुंदर गळा आणि कितीतरी दिवसांनी आवाज ऐकला तुझा म्हणत चाहते तिला कमेंट्ससुद्धा करत आहेत. चाहत्यांना प्रियाचा सुरीला अंदाज खुपचं आवडलेला दिसत आहे.

(हे वाचा: देवी सिंगची नवी खेळी; तुरुंगात होणार डॉक्टरचा खळबळजनक इंटरव्ह्यू)

प्रिया कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधी पती आणि अभिनेता उमेश कामतसोबत असणाऱ्या सुंदर केमिस्ट्रीमुळे चर्चेत असते. प्रिया आणि उमेशची जोडी चाहत्यांकडून खुपचं पसंत केली जाते. प्रियाने ‘टाईमपास 2, वजनदारसारख्या चित्रपटांत उत्तम काम केलं आहे. तर पती उमेशसोबत ‘आणि काय हवं’ हा शोदेखील खुपचं लोकप्रिय झाला आहे. प्रिया अभिनेत्रीसोबतचं एक निर्मातीसुद्धा आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment