मुंबई, 29 ऑगस्ट: अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) सध्या तिची नवी मालिका ‘अजूनही बरसात आहे…‘च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुक्ताच्या टेलिव्हिजनवरील कमबॅकने तिच्या असंख्य चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता. शिवाय तिच्यासह अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) याने देखील छोट्या पडद्यावर दीर्घकाळानंतर वापसी केली आहे. ‘लग्न पाहावे करून..’ या सिनेमापासून ते आता ‘अजूनही बरसात आहे’ (Mukta Barve and Umesh Kamat New Serial) या मालिकेपर्यंत जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. दरम्यान या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ देखील हे दोन्ही कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. या व्हिडीओंना देखील विशेष पसंती मिळते आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने नुकताच एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर ट्रेंड होणाऱ्या एका रीलचा (Instagram Trending Reel) चा हा व्हिडीओ आहे. हे वाचा- ‘अनिरुद्ध देशमुख हरवला आहे, संजनाला संपर्क करा…’ VIRAL होतेय ही पोस्ट मुक्ता बर्वेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या दोन सहकलाकार देखील आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पुर्वा फडके आणि सुहिता थत्ते देखील आहेत. सुहिता थत्ते यांचे विशेष कौतुक मुक्ताने हा व्हिडीओ शेअर करताना केले आहे. दरम्यान या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आम्ही शूटिंग करतोय, जेव्हा आम्ही शूटिंग नाही करत आहोत..’ असं मजेशीर कॅप्शन मुक्ताने या व्हिडीओला दिलं आहे.
मुक्ताने याआधी देखील काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून ती विशेष सक्रिय असल्याचं दिसत आहे. शिवाय इन्स्टाग्राम ट्रेंड फॉलो करताना तिचा नवा अंदाज देखील पाहायला मिळत आहे. सेटवरील सहकलाकारांबरोबर तिचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
दरम्यान अभिनेता उमेश कामत देखील यामध्ये मागे राहिलेला नाही आहे. त्याने देखील सेटवरील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने अगदी चपखल असं कॅप्शन देखील दिलं आहे- ‘अजूनही वेडेपणा आहे..’