मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD:'म्हणून मेकअप रुमचं दार तोडलं', मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकरच्या भांडणाचा भन्नाट किस्सा

HBD:'म्हणून मेकअप रुमचं दार तोडलं', मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकरच्या भांडणाचा भन्नाट किस्सा

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande)  मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 मे- अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande)  मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या खणखणीत अभिनयाच्या जोरावर मृण्मयीने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.  अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस(Birthday) आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया मृण्मयी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकारच्या(Siddharth Chandekar) भांडणाचा भन्नाट किस्सा.

" isDesktop="true" id="557448" >

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा जन्म 29 मे 1988 मध्ये झाला होता. मृण्मयी पहिल्यांदा ‘द ब्रेकिंग न्यूज’ या चित्रपटात झळकली होती. तसेच ‘अग्निहोत्र’ ही मृण्मयीची पहिली मालिका होती. याच मालिका दरम्यानचा एक किस्सा मृण्मयीने चाहत्यांशी शेयर केला होता. तो किस्सा ऐकून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

अग्निहोत्र मालिकेमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसुद्धा होता. मृण्मयी आणि सिद्धार्थ कॉलेज पासूनचे मित्र आहेत. आणि ते दोघेही एकमेकांशी भयानक भांडत असतात. सतत त्यांच्या भांडणाचे मजेशीर किस्से ऐकायला मिळतात. हा किस्सा सुद्धा असाच आहे.

(हे वाचा:सुशांतवर वादग्रस्त ट्वीट करणं दिग्दर्शकाच्या अंगाशी, चाहत्यांकडून ट्रोल  )

मालिकेदरम्यान मृण्मयी आणि सिद्धार्थमध्ये भांडण झालं. आणि दोघे एकमेकांशी हातापायी करू लागले. आणि याच दरम्यान दोघांनी चक्क मेकअप रूमचा दरवाजाचं तोडला. ज्यावेळी सेटवरच्या लोकांनी दरवाजा तुटलेला बघितला. तेव्हा त्यांना कळत नव्हतं, की हे कसं झालं. आणि या दोघांनीही त्यांना सांगितलं नाही, की हे त्यांनीचं केल आहे. हे दोघेही दरवाजा तोडून सेटवर दुसरीकडे जाऊन असं बसले होते की जसं काही झालंचं नाही.

(हे वाचा:रसिका सुनील बॉयफ्रेंडसोबत देतेय 'Couple Goals', पाहा या जोडीचे रोमँटिक PHOTO  )

तर असा हा भन्नाट किस्सा मृण्मयीने आपल्या एका मुलाखतीमध्ये शेयर केला आहे. सिद्धार्थ आणि मृण्मयी जितके भांडतात. तितकेच घट्ट मित्रही आहेत. ते सतत आपले असेच भन्नाट किस्से शेयर करत असतात.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment