हमुंबई, 29 मे- बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतनं गेल्या वर्षी जून महिन्यात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आता त्याच्या मृत्यूला एक वर्ष (Sushant Singh Rajput Death Anniversary) पूर्ण होत आलं आहे. नुकताच त्याचा जवळचा मित्र समजला जाणारा त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. यामुळे सुशांत मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सुशांतचं कुटुंब, मित्र आणि चाहते गेली वर्षभर त्याच्यासाठी न्याय मागत आहेत. अशातच दिग्दर्शक अनुभव सिन्हा (Director Anubhav Sinha) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. सिन्हा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यूजर्स आणि सुशांतचे चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.
SSR Season2 coming soon ….
— Anubhav Sinha (@anubhavsinha) May 28, 2021
सुशांत सिंह राजपूत बद्दल ट्वीट केल्यानंतर युजर्सनी अनुभव सिन्हा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनुभव सिन्हा यांनी सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनाकडे इशारा करत ट्वीट केलं. या ट्वीटमध्य त्यांनी लिहिलं, ‘SSR सीजन 2 लवकरच येत आहे’. या ट्वीटनंतर सुशांतच्या चाहत्यांनी सिन्हा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांचं हे ट्वीट पाहून युजर्स भलतेच संतापले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हे वाचा: Video : ‘माझा होशील ना फेम’ गौतमीने वीर सावरकरांना अशी वाहिली आदरांजली ) एका युजरने ट्वीट करत म्हटलं आहे, ‘कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूची टिंगल करणं खूप चुकीचं आहे’. तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे ‘तुम्ही त्याच्या मृत्यूची चेष्टा करत आहात का?, तर आणखी एका युजरने नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, ‘तुझा पण नंबर लवकरच येणार’. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. चाहत्यांच्या मते दिग्दर्शकाने हा ट्वीट करून सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवली आहे. (हे वाचा: ‘हे करायला Netflixनं सांगितलं का?’ बबलू पंडितनं केली Amazon Primeची तक्रार ) गेल्यावर्षी 14 जूनला बांद्राच्या आपल्या अपार्टमेंटमध्ये सुशांत मृत अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर वर्षभर त्याचे चाहते आणि कुटुंबीय त्याच्यासाठी न्याय मागत आहेत. सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनाला फक्त काही दिवस बाकी आहेत. मात्र नुकताच त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीच्या अटकेमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.