मुंबई, 10 जुलै- अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) मराठीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहीण गौतमीसुद्धा(Gautami Deshpande) या क्षेत्रात आली आहे. या दोघी बहिणी सतत आपल्याला एकमेकांसोबत दिसून येतात. या दोघींच्यामध्ये खुपचं छान नातं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत. दोघीही सतत विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्र दिसून येतात. मात्र मृण्मयीने नुकताच एक व्हिडीओ शेयर करत गौतमीला चोर असं म्हटलं आहे. पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरण...
View this post on Instagram
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. खर सांगायचं तर हा व्हिडीओ खुपचं मजेशीर आहे. यामध्ये मृण्मयी सांगते की आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडत आहे, ‘मी आज गौतमीच्या घरी आहे. तिचं कपाट मी लावत आहे. आणि मला सांगयला अत्यंत आनंद होत आहे, की माझे सगळे हरवलेले कपडे या कपाटात सापडले आहेत.
(हे वाचा: 'एक बार पेहरा ..' 'मुलगी झाली हो' कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल, VIDEO झाला VIRAL)
मी गौतमीला अनेकवेळा विचारलं होतं. माझे हे कपडे चुकून तुझ्याकडे आले आहेत का? यावर तिनं सरळ सरळ नाही असं उत्तर दिलं होतं. आणि आज अक्षरशः या कपाटात माझे ते कपडे बोळ्याच्या स्वरुपात ठेवण्यात आले होते. गौतमी चोर आहे. तिने माझे सगळे कपडे चोरून लपवले आहेत’. अशी व्यथा मृण्मयीने मांडली आहे. असा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. सर्वांना या बहिणीचं प्रेम आणि यांचं हे गोड नातं खुपचं पसंत पडत आहे. चाहते मोठ्या प्रमाणात मजेशीर कमेंट्स करून या व्हिडीओला प्रतिसाद देत आहेत.
सध्या मृण्मयी ‘लिटल चॅम्प मराठी’ मध्ये होस्टची भूमिका साकारत आहे. तर तिची लहान बहीण आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘माझा होशील ना’ या मालिकेत सईची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.