मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'एक बार पेहरा..' 'मुलगी झाली हो' कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल, VIDEO झाला VIRAL

'एक बार पेहरा..' 'मुलगी झाली हो' कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल, VIDEO झाला VIRAL

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका बरीच पसंत केली जाते.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका बरीच पसंत केली जाते.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका बरीच पसंत केली जाते.

मुंबई, 10 जुलै- सध्या सोशल मीडियावर ‘एक बार पेहरा हटादे’ या गाण्याची चांगलीच धूम आहे. प्रत्येक कलाकार या गाण्यावर आवर्जून रील (Reel) करत आहेत, आत्ता यामध्ये ‘मुलगी झाली हो’ (Mulagi Zali Ho) या मालिकेच्या कलाकारांनाचाही समावेश झाला आहे. मालिकेतील कलाकार आणि सेटवरील इतर क्रु मेंबर मिळून या गाण्यावर धम्माल करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेझच आली आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते कलाकरांपर्यंत सर्वचजण विविध रील बनवत असतात. अशातच आत्ता ‘एक बार पेहरा हटादे’ या गाण्याचा जणू ट्रेंडचं सुरु आहे. या गाण्यावर प्रत्येकजण धम्माल डान्स करताना दिसत आहे. स्टार प्रवाहवरील प्रसारित होणारी मालिका ‘मुलगी झाली हो’ मधील कलाकारसुद्धा ऑफस्क्रीन मस्ती करताना दिसून येत आहेत. मालिकेतील माऊ, शौनक आणि सिद्धांत मिळून या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. तसेच सेटवरील इतर क्रु मेंबर्सनीही यामध्ये एन्ट्री करत धम्माल केली आहे.

(हे वाचा:स्मिता गोंदकर कोळीण बनून लुटतीये Fishing चा आनंद; पाहा VIDEO  )

सध्या या व्हिडीओला चाहत्यांची खुपचं पसंती मिळत आहे. चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्ससुद्धा करत आहेत. अनेक युजर्सनी माऊला जबरदस्त डान्सरसुद्धा म्हटलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिका बरीच पसंत केली जाते. हे कलाकार मालिकेमध्ये जितके गंभीर दाखवण्यात आले आहेत. याउलट ते सेटवर खूपच धम्माल करत असतात. हे कलाकार मिळून ऑफस्क्रीन खुपचं मजामस्ती करत असतात. मालिकेतील कलाकारांचं ऑफस्क्रीन खूपच छान केमिस्ट्री दिसून येते. तसेच या कलाकारांचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. आणि ते चाहत्यांना खुपचं पसंतदेखील पडत असतात.

First published:

Tags: Marathi entertainment, TV serials