मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /स्मिता गोंदकर कोळीण बनून लुटतीये Fishing चा आनंद; पाहा VIDEO

स्मिता गोंदकर कोळीण बनून लुटतीये Fishing चा आनंद; पाहा VIDEO

मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर खुपचं चर्चेत आली होती. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर खुपचं चर्चेत आली होती. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर खुपचं चर्चेत आली होती. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मुंबई, 10 जुलै- अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) नेहमीच सोशल मीडियावर काही नं काही शेयर करत असते. स्मिताने नुकताच एक व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. त्यामध्ये ती चक्क फिशिंग करताना दिसून येत आहे. तसेच हा आपला पहिलाच अनुभव असल्याचंही ती सांगते.

मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर खुपचं चर्चेत आली होती. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. स्मिता गोंदकर मराठीतील एक अतिशय फिट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. स्मिताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवे एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एका तलावामध्ये चक्क फिशिंग करताना दिसून येत आहे. स्मिता यामध्ये पावसाळ्याचा आनंद लुटत आहे. व्हिडीओमध्ये खुपचं सुंदर निसर्ग दिसून येत आहे. या व्हिडीओला स्मिताने मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. स्मिता म्हणते ‘मी पहिल्यांदाच मासा धरण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या गळाला फक्त खेकडेचं लागले’.

(हे वाचा: VIDEO: चक्क अरुंधतीने संजनाला दिली धमकी; 'आई कुठे काय करते' विशेष भाग )

स्मिताचा हा व्हिडीओ चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा देत आहेत. तर काही युजर्स मजेशीर कमेंट्ससुद्धा करत आहेत. एकंदरीतचं स्मिताचा हा व्हिडीओ युजर्सना खुपचं पसंत पडत आहे.

(हे वाचा:बाळंतपणानंतर वजन कसं करायचं कमी? धनश्रीने दिल्या After Pregnancy टिप्स  )

स्मिता गोंदकर ‘पप्पी दे पप्पी दे पारोला’ या गाण्यामुळे खुपचं प्रसिद्ध झाली होती. ती आजही या गाण्यामुळे ओळखली जाते. त्यानंतर बिग बॉस मराठीने तिला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे. तिला बिग बॉसच्या घरात खुपचं पसंत करण्यात आलं होतं. यांनतर ती झी मराठीवरील रहस्यमयी मालिका ‘काय घडलं त्या रात्री’ मध्ये ती झळकली होती. स्मिता फिटनेसच्या बाबतीत खूपच सतर्क असते. ती सतत योगा करत असते. नेहमीच सोशल मीडियावर तिच्या फिटनेसची चर्चा होत असते.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment