मुंबई, 23 मे- मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार
(RaanBaazaar ) ही मराठी वेबसिरीज बोल्ड सीन्समुळे चांगलीच चर्चेत आहे. बोल्ड भूमिकेमुळे यातील अभिनेत्रींना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. या सिरीजमध्ये
(ranbazar marathi web series) तगडी स्टारकास्ट आहे, त्यामुळे देखील या सिरीजची चर्चा आहे. प्रत्येकाची भूमिकाही वेगळी आहे. नुकतीच ही वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर
(planet marathi ott) रिलीज झाली आहे. वेबसिरीज रिलीज होताच लावणी क्वीन म्हणून ओळख असलेली अभिनेत्री माधुरी पवार
(madhuri pawar in ranbazar web series) हिच्या भूमिकेची चर्चा रंगली आहे. यामध्ये ती एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.
माधुरी पवार हिनं या सिरीजमध्ये प्रेरणा पाटीलची भूमिका साकारली आहे. यातील माधुरी पवारचा लुक सध्या सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे. प्रत्येक अभिनेत्रीला करिअरमध्ये ग्लॅमरस भूमिका एकदा तरी करायची असती. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका साकारण्याची हिम्मत खूप कमी अभिनेत्री करताना दिसतात. हेच धाडस माधुरी पवार हिनं रानबाजार या सिरीजमध्ये दाखवलं आहे.
वाचा-
तेजस्विनी पंडितच्या बोल्ड भूमिकेवरून सोशल मीडियावर 'रानबाजार' उठवणं कितपत योग्य?
या सिरीजमध्ये प्रेरणा पाटीलची भूमिका साकारण्यासाठी माधुरी पवारनं टक्कल केल्याची चर्चा आहे. राजकारणातील एका मुत्सद्दी स्त्रीची भूमिका माधुरीने यात चोख बजावली आहे. तिचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. तिच्या रानबाजारमधील लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना माधुरी पवार म्हणते, अशी भूमिका मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षित होत. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. राजकारणातील स्त्रीयांच्या वरील पुस्तक वाचली. इतकेच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी अक्षरशः शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस केली. यामुळेच ही भूमिका आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेरणा सायाजीराव पाटील साने या भूमिकेमुळे माझी अभिनयाच्या भूक भागली आहे, असे म्हटंले तर वावगे ठरणार नाही.
वाचा-
'मोदीची आंबाबर्फी मला लै आवडती..' किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत
आतापर्यंत माधुरी पवार हिला आपण देवमाणूस, तुझ्यात जीव रंगला या मालिकेत वेगळ्या भूमिकेत पाहिलं आहे. पण या सिरीजमध्ये तिची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली. सध्या तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.