Home /News /entertainment /

Happy Birthday Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितच्या बोल्ड भूमिकेवरून सोशल मीडियावर 'रानबाजार' उठवणं कितपत योग्य?

Happy Birthday Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितच्या बोल्ड भूमिकेवरून सोशल मीडियावर 'रानबाजार' उठवणं कितपत योग्य?

Happy Birthday Tejaswini Pandit: तेजस्विनीने देखील रानाबाजार या सिरीजमध्ये बोल्ड भूमिका साकारून मराठी अभिनेत्री कुठेच मागे नसल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे तेजस्विनीच्या बोल्ड भूमिकेवर सोशल मीडियावर रानबाजार उठवणं कितपत योग्य आहे..असा प्रश्न निर्माण होतो.

पुढे वाचा ...
  मुंबई, 22 मे- मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार  (RaanBaazaar ) ही मराठी वेबसिरीज चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित बोल्ड  (Happy Birthday Tejaswini Pandit ) भूमिकेत दिसत आहेत. या सिरीजच्या ट्रेलरपासून  (RaanBaazaar Trailer) अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नेटकऱ्यांनी जबरदस्त ट्रोल  (  Tejaswini Pandit Troll )केलं आहे. सिरीज रिलीज झाल्यानंतर देखील हे ट्रोलिंग थांबलं नाही. मात्र एककीडे तेजस्विनी पंडित ट्रोल होतेय मात्र दुसरीकडं तिचं कौतुक देखील होत आहे. मुळात कौतुक हे झालं पाहिजे कारण आतापर्यंत आपण मराठी अभिनेत्री म्हणजे एक विशिष्ट चित्र समोर घेऊन चालत आलो आहे. तेजस्विनीने देखील रानाबाजार या सिरीजमध्ये बोल्ड भूमिका साकारून मराठी अभिनेत्री कुठेच मागे नसल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे तेजस्विनीच्या बोल्ड भूमिकेवर सोशल मीडियावर रानबाजार उठवणं कितपत योग्य आहे..असा प्रश्न निर्माण होतो. तेजस्विनीने रानबाजार सिरीजमध्ये साकारलेल्या बोल्ड भूमिकेकडं तिचं काम म्हणून पाहिलं आहे. मुळात कलाकाराचं काम आणि वैयक्तिक आय़ुष्य याची आपण सरळमिसळ करतो आणि त्यांना ट्रोल करत सुटतो. तेजस्विनीच्या बाबतीत देखील तेच होताना दिसत आहे. पण या सगळ्याचा तेजस्विनी धैर्याने सामोरे जाताना दिसते आहे. यातच तिचा कणखरपणा आधोरिकीत होतो. वाचा-Happy Birthday Tejaswini Pandit: चाहत्यांची लाडकी तेजू कशी बनली एक यशस्वी अभिनेत्री? मराठी अभिनेत्री देखील आता वेगळ्या धाडणीच्या भूमिका साकारताना दिसतात. बोल्ड सीन्स देताना देतात. मात्र काही लोक नेहमीच त्यांना संस्कृतीचं लेबल लावून ट्रोल करताना दिसतात. तेजस्विनी पंडितच नाही तर यापूर्वी देखील मराठी अभिनेत्रींना बोल्ड भूमिका साकारल्यावरून ट्रोल करण्यात आलं आहे. प्रिया बापट, अनुजा साठे या अभिनेत्री देखील बोल्ड सीन्सवरून ट्रोल झाल्या आहेत. तेच सगळं पुन्हा रानबाजार सिरीजमुळं तेजस्विनीच्या वाट्याला आलं आहे. मात्र मराठी प्रेक्षक म्हणून आपण तिच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. वाचा-ट्विटरवर ट्रेंड होतेय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, काय आहे कारण? मराठी अभिनेत्री देखील मराठीतच नाही तर विविध भाषेत काम करताना दिसतात. त्यांच्या सीमा आता विस्तारल्या आहेत. जितकं आपण बोल्ड भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्रींच कौतुक करतो, तितकचं आपल्या मराठी अभिनेत्रींच देखील करायला पाहिजे. आता मनोरंजन विश्व देखील काथ टाकताना दिसत आहे. बॉलिवूड असेल किंवा आणि कोणती फिल्मी इंडस्ट्री इकड देखील साकारतात की अभिनेत्री बोल्ड भूमिका. आपण ते मात्र खुल्या डोळ्यानं पाहतो आणि उगड़या मनानं त्याचं कौतुक करत असतो. मग आपल्या मराठी अभिनेत्रीनं बोल्ड भूमिका साकारल्या म्हणून बिघडलं कुठं? तेजस्विनीनं देखील आजपर्यंत विविध साच्यातील भूमिका साकारल्या आहेत. ही भूमिका तिच्यासाठी पण आव्हानात्मकच आहे. पण तिनं ते आव्हान पैल्याचे दिसत आहे. अशी भूमिका निवडण्याचे धाडस दाखवल्याबद्दल तिचं कौतुक करण गरजेचे आहे. कधीकधी कलाकार कथेची गरज म्हणून त्या भूमिका जगताना दिसतो. पण आपण मात्र त्यांना ट्रोल करतो.
  तेजस्विनीचा बोल्ड अंदाज ज्याप्रमाणे सिरीजमध्ये आपण पाहतो तितकीच ती विचारानं देखील बोल्ड असल्याचे तिचा आजपर्यंतचा करिअरचा आलेख पाहिला तर लक्षात येते. प्रत्येकवेळी ती नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करत असते. रानबाजरमध्ये बोल्ड़ भूमिका साकारून तिनं तिचं वेगळ पण पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. अशा या बोल्ड बेबला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!! Happy Birthday Tejaswini Pandit
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या