मुंबई, 22 मे- स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेते किरण माने
(kiran mane ) महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. याशिवार किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या परखड लेखणीमुळे नेहमीच चर्चेत असतात. समाजातील विविध विषयावार ते मत मांडताना दिसतात. मागच्या काही दिवसांपासून किरण माने यांचे नाव सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणावरून चर्चेत आहे. मुलगी झाली हो मालिकेतून त्यांना काढल्यानंतर त्यांच्ये नाव चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर किरण माने अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेताना दिसले होते. त्यामुळे हे प्रकरण विविध पैलूंनी चर्चेत राहिलं होतं. आता किरण माने
( kiran mane latest post ) यांनी एक नवी पोस्ट लिहिली आहे ज्यामुळं ते चर्चेत आले आहेत. ही पोस्ट दुसऱ्या कशाविषयी नाही तर त्यांच्या खाद्यभ्रंमतीविषयी आहे. त्यांच्या खाण्याच्या आवडीबद्दल त्यांनी या पोस्टच्या माध्यामातून सांगितलं आहे.
किरण माने यांनी इन्स्टाला एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यांनी त्यांच्या खाण्याच्या आवडीविषयी सांगितलं आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''मटनचिकन आनि कोल्हापूरी तांब्डापांढर्याच्या जेवनावर मी जेवढा तुटून पडतो, तेवढाच मी 'गोडा'साठी लै लै लै येडा हाय ! मुळात मी कंदी पेढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गांवात र्हानारा वो... कुटल्या गांवात जाईल तिथं मी तिथलं वेगळं 'पेशल' स्वीट शोधत असतो. सातार्यात कंदी पेढ्यापेक्षा लाटकरची आनि मोदीची आंबाबर्फी मला लै आवडती... उस्मानाबादचा गुलाबजाम, बेळगांवचा कुंदा, माहीमच्या सागर स्विटस् मधलं अफलातून, पुन्यातली सुजाता मस्तानी... जाईल तिथं पोटभर जेवन झाल्यावर गोडावर ताव मारल्याशिवाय माझं मनच भरत नाय ! घरातल्यांनी प्रभादेवीला सिद्धीविनायकाच्या आनि सोलापूरला सिद्धेश्वरच्या दर्शनाला नेल्यावर माझं लक्ष देवाकडं कमी आन् बुंदीच्या लाडूच्या प्रसादावरच जास्त असतं. लै नादखुळा असत्यात लाडू ! 😜''
वाचा-
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोचं काय आहे श्रेयस तळपदेचं कनेक्शन?
''...आज एका कामासाठी ठाण्याला गेलोवतो. अचानक एका दुकानावर नांव दिसलं 'पुरणपोळी घर' ! म्हन्लं च्यायला हे कायाय? दुकानात गेलो, तर पुरनपोळीचे खच्चून सत्राशेसाठ प्रकार... गाजर पुरणपोळी, खजूर पुरणपोळी, खव्याची पुरणपोळी, गुलकंद पुरणपोळी, अननस पुरणपोळी, बदाम पुरणपोळी, फणस पुरणपोळी...आवो, लैS व्हरायटी. वाचूनच गोंधळ उडला, हे घेऊ का ते घेऊ...तरीबी खव्याची आर्डर दिली.''
वाचा-
Twitter वर ट्रेंड होतेय Tejaswini Pandit, काय आहे कारण?
''...तिथलं सगळ्यात मला काय आवडलं आसंल? ऑर्डर दिल्यावर गरमागरम ताजी पोळी केली वो.. माझ्यासमोर ! तोंडाला पानीच सुटलं. त्या मानसानं मस्तपैकी लुसलुशीत कनकेचा गोळा घेतला, त्यात पुरणाची मूद रोवली, तेलात बुडवून लाटायला सुरूवात केली... मस्त खरपूस होईपर्यन्त तव्यावर भाजली.. आन् टम्म फुगलेली गरमागरम पुरनपोळी पुढ्यात हज्जर ! मनभरून ताव मारला... मन तृप्त झालं...''
''आजचा दिवस सार्थकी लागला...अन्नदाता सुखी भव !..''असं म्हणतं किरण माने यांनी या पोस्टमध्ये आपल्या पुरणपोळी प्रेमाविषयी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.