जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : क्रांती रेडकरला हे काय झालं? एका दिवसात करावी लागली चार ऑपरेशन्स

Video : क्रांती रेडकरला हे काय झालं? एका दिवसात करावी लागली चार ऑपरेशन्स

kranti redkar

kranti redkar

क्रांती तशी फिटनेस फ्रिक आहे पण अचानक तिला काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 मार्च : ‘श्रीमंत गंगाधर पंत’, ‘खो-खो’, ‘जत्रा’, ‘नो एंट्री’ सारख्या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. क्रांती तिच्या दोन्ही जुळ्या मुलींबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असते. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील तिच्या व्हिडीओवर फिदा असतात. पण क्रांतीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती दिवसभरात तिची 4 ऑपरेशन्स झाल्याचं सांगत आहे.  क्रांती तशी फिटनेस फ्रिक आहे पण अचानक तिला काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. क्रांतीनं अभिनेत्री म्हणून अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये कामं केली. त्यानंतर क्रांती दिग्दर्शिका म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. ‘काकण’ सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन तिनं केलं. त्यानंतर आता ‘रेनबो’ हा तिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी क्रांती सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. लेकांबरोबर धम्माल व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीही तिनं मुलींबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : ‘हे व्हावं की नाही…?’ अरुंधतीच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री मधुराणी क्रांतीनं शेअर केलेल्या व्हिडीओला तिनं ऑपरेशन डॉक्टर असं कॅप्शन दिलं आहे. क्रांती फारच गंभीर दिसत आहे. तिच्या कपाळावर प्लॉस्टिकच्या चिकटपट्ट्या चिकटवल्या आहेत.  व्हिडीओमध्ये क्रांती म्हणतेय, “घरी डॉक्टर सेट आलेला आहे आणि सकाळपासून माझ्यावर 4 ऑपरेशन्स झाले आहेत.  मायक्रोस्कोपनं पेशंटला पाणी पाजलं जात आहे. असं सगळं चालू आहे. दोघींनी तब्येत बरी नव्हती. दोघींना  बरं वाटावं म्हणून डॉक्टर सेट आणले आहेत”.

जाहिरात

क्रांतीच्या या मजेशीर व्हिडीओवरून लक्षात आलं असेल की क्रांतीच्या दोन्ही मुलींनी खेळण्यातील डॉक्टर सेटनं तिच्यावर ऑपरेशन केले आहेत. क्रांतीच्या या व्हिडीओ चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. क्रांती नेहमीच मुलींबरोबरचे असे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडीओवर कमेंट्स करत एका युझरनं लिहिलंय, “संध्याकाळपर्यंत काउंटरवर चार चॉकलेट्स दोन आईस्क्रीम आणि तीन लॉलीपॉप जमा करणे. तरच पेशंटला हॉस्पिटल मधून सुट्टी”. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, “मुलींमध्ये कधी दिवस जात असेल तुमचा कळतही नसेल ना”. तर आणखी एका युझरनं, “टाके सॉलीड घातलेत” अशी मजेशीर कमेंट केलीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात