Home /News /entertainment /

VIDEO: कार्तिक आर्यनसाठी दोन तरुणींनी चक्क एयरपोर्ट केलं असं काही,अभिनेत्याने मारला कपाळावर हात

VIDEO: कार्तिक आर्यनसाठी दोन तरुणींनी चक्क एयरपोर्ट केलं असं काही,अभिनेत्याने मारला कपाळावर हात

सध्या सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एयरपोर्टवर दिसून येत आहे

  मुंबई, 23 मार्च-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता कार्तिक आर्यन   (Kartik Aryan)  आज तरुण पिढीमध्ये फारच लोकप्रिय बनला आहे. नुकतंच कार्तिक आर्यन मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाला. त्याचा एयरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कार्तिकच्या दोन चाहत्या त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. या महिला फॅन्स कार्तिकचा पाठलाग करून नेमकं काय करतात हे हा व्हिडीओ   (Viral Video)  पहिल्यांनंतर तुमच्या लक्षात येईलच. सध्या सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एयरपोर्टवर दिसून येत आहे. तो पुढं बघून चालत असतो दरम्यान दोन तरुणी त्याचा पाठलाग करत असतात. त्यानंतर त्या तरुणी अभिनेत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि समोर येत अभिनेत्याला गुलाबाचं फुल देतात. या व्हिडिओमध्ये एक पापाराझी त्या दोन्ही मुलींना कार्तिकला प्रपोज करण्यास सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. कार्तिकही त्यांच्याशी संवाद साधून, शेक हॅन्ड करून त्यांना बाय म्हणताना दिसत आहे.विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनची चाहती त्याला गुलाब देताना म्हणते, “हे तुमच्यासाठी. इतकं मौल्यवान असल्याबद्दल धन्यवाद." पापाराझींपैकी एक म्हणतो, "गुडघ्यावर बसून प्रपोज करा" त्यातील दुसरी मुलगी म्हणते, "आज माझा वाढदिवस आहे." आणि आपल्या हातातील पुष्पगुच्छ कार्तिकला देते, जो तो घेण्यास नकार देतो.परंतु त्यांच्याशी गोड पद्धतीने संवाद साधतो.
  अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अभिनेत्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत अभिनेत्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. तर अभिनेताही सोशल मीडियावरून आपली प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असतो. नुकतंच त्यानं शहजादाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तसेच तो आगामी काळात भुलभुलैय्या 2, फ्रेडी, सत्य नारायण कि कथा' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Kartik aryan, Viral video.

  पुढील बातम्या