जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चित्रपटांना रामराम करत 'या' अभिनेत्रीनं धरली गावाची वाट, कोकणात फुलवली शेती

चित्रपटांना रामराम करत 'या' अभिनेत्रीनं धरली गावाची वाट, कोकणात फुलवली शेती

चित्रपटांना रामराम करत 'या' अभिनेत्रीनं धरली गावाची वाट, कोकणात फुलवली शेती

अभिनेत्री संपदा कुलकर्णी (sampda kulkarni) पती राहुल कुलकर्णीसोबत( Rahul Kulkarni) कोकणात उत्तम प्रतीची शेती करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मे-   सध्या अनेक लोक शेतीकडे वळत आहेत. यामध्ये कलाकारांचासुद्धा समावेश होतो. मराठीतील अभिनेत्री(Marathi Actress)  संपदा कुलकर्णीने (Sampda Kulkarni)  आपली अभिनयसृष्टीची वाट बदलत शेती करण्यात स्वतःला झोकून दिलं आहे. ती पती राहुल कुलकर्णीसोबत( Rahul Kulkarni) कोकणात उत्तम प्रतीची शेती करत आहे.  एक उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिकाच्या भूमिकेत तिला अनेकांनी पाहिलं असेल. मात्र तिला एका शेतकरीच्या(Farmer) रुपात पाहणं खुपचं कौतुकास्पद ठरत आहे. संपदा सध्या कोकणातील ‘फुणगूस’ या गावी आपल्या पतीसह शेती करत आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन तिला शेतीकडे वळण्याची इच्छा झाली आणि तिने कोणताही विचार न करता आपली इच्छा प्रत्यक्षात उतरवली. राहुल आणि संपदाला शेतीचा थोडाही गंध नव्हता. मात्र जाहिरात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राहुलने विविध शेतीविषयक पुस्तके, गुगल, तज्ञ मंडळी यांच्या सहाय्याने शेतीचं रीतसर ज्ञान आत्मसात केलं. आणि त्यानंतर आपल्या नोकरीला कायमचा रामराम ठोकून पूर्णपणे स्वतःला शेतीत झोकून दिलं. आणि त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत, संपदाने सुद्धा शेतीत उतरायचा निर्णय घेतला. आणि दोघांच्या जोडीने स्वतःसाठी एक नवं जग खुलं केलं. या दोघांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक पिक घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आंबा, काजू यांसारख्या फळांची सुद्धा लागवड केली. यांचा भाजीपाला आणि फळे थेट मुंबईमध्ये सुद्धा विक्रीसाठी जातात. केवळ डोंगराळ भाग असणाऱ्या जमिनीवर दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर या दोघांनी आनंदवन फुलवलं आहे. (हे वाचा: चाहत्याचा सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरात राडा, वडील जखमी ) तसेच हे दोघे कोकणातील पर्यटनाला बढावा देत आहेत. यांनी ‘आनंदाचे शेत’ ही एक संकल्पना सुरु केली आहे. यामध्ये ते येणाऱ्या पर्यटकांना अगदी पारंपरिक पद्तीने बैलगाडीतून फेरफटका मारून आणतात. आणि त्यांना कोकण, शेती, उत्पादने यांबद्दल उत्कृष्ट माहितीसुद्धा देतात. म्हणजेच शेती करत हे लोक सामाजिक भानसुद्धा जपत आहेत. (हे वाचा: बाराव्या वर्षी गाठली होती मुंबई,संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांची Musical Journey ) या दोघांची मुलगी शर्वरी कुलकर्णी सुद्धा एक अभिनेत्री आहे. तिने  ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत काम केलं आहे. ती अलीकडेच विभव बोरकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे.  आज संपदा आणि राहुल कुलकर्णीच्या शेतीसाठी या पाऊलाचे कित्येक लोक तोंडभरून कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात