मुंबई, 25 मे: बॉलिवूड मध्ये असे अनेक उत्तम संगीत दिग्दर्शक (Bollywood Music Director) आहेत, ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. त्यांची गाजलेली गाणी त्यांच्या कलेची साक्ष देतात. या यादीतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे उत्तम सिंग (Uttam Singh) होय. उतम सिंग आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने आज त्यांच्या आयुष्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया. उत्तम सिंग यांचा जन्म 25 मे 1948 मध्ये पंजाब येथे झाला होता. त्यांचे वडील एक सितार वादक होते आणि ते विविध गुरुद्वारामध्ये कीर्तन करत होते. त्यांच्या सोबत राहून उत्तम सिंग यांना सुद्धा ती गोडी लागली होती. ते आपल्या वडिलांसोबत कीर्तनासाठी जात होते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थलांतरित झालं होतं. मुंबई मध्ये आल्यानंतर उत्तम सिंग यांनी 2 वर्षे तबला आणि व्हायोलिनचं वादनाचं रीतसर शिक्षण घेतलं.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांचे सहाय्यक असणाऱ्या मोहम्मद सफी यांनी त्यांना तबला वादनाची पहिली संधी दिली होती. त्यांनतर त्यांच्या कारकिर्दीला वेग आला होता. त्यांनतर त्यांची इलीयाराजा यांच्याशी भेट झाली. आणि त्यांच्याकडून त्यांच्या कारकिर्दीला आकार मिळाला.
पुढे त्यांची ओळख जगदीश खन्ना या संगीतप्रेमीशी झाली. यातूनच उत्तम-जगदीश या जोडीचा जन्म झाला. मात्र काही काळानंतर जगदीश यांचा अचानक मृत्यू झाला. आणि मग उत्तम सिंग एकटे झाले. पुढे ते एकटेच संगीत निर्मिती करू लागले. (हे वाचा: राहुल गांधींना ‘लोकशाहीचा राजा’ म्हणणारेच मोदींच्या विजयास कारणीभूत: जावेद अख्तर ) उत्तम सिंग हे पंचमदा यांच्या वादन ग्रुपमधील मुख्य व्हायोलिन वादक होते. त्यांना नौशाद, मदनमोहन,रोशन यांसारख्या मोठ्या कलाकारांनी वादनाच्या कित्येक संधी दिल्या आहेत. त्यांच्या संगीतावर हे सर्व लोक फिदा झाले होते. (हे वाचा: ‘…तर कानाखाली आवाज काढेन’; आदित्यच्या त्या वक्तव्यावर अमेय खोपकर संतापले ) उत्तम सिंग यांनी दिल तो पागल है, फर्ज, बागबान, मैने प्यार किया, गदर, प्यार दिवाना होता है, हम तुम पे मरते है, जज्बात सारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटात संगीत दिलं आहे.

)







