• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • हेमांगी कवीने शिकवली KISS ची बाराखडी! तुम्ही पाहिला का हा VIDEO

हेमांगी कवीने शिकवली KISS ची बाराखडी! तुम्ही पाहिला का हा VIDEO

हेमांगी Kiss ची बाराखडी ( kiss barkhadhi ) सांगताना दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ( hemangi kavi) ही सोशल मिडीयावर नेहमी अॅक्टीव असते. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओची तर कधी हेमांगीच्या फोटोंची चर्चा असते. हेमांगीने नुकतेच काही इन्स्टा रील  (instagram reel) शेअर केले आहेत ज्यामुळे तिने सर्वांचे लक्षवेधलं आहे. सध्या तिचे हे इन्स्टा रील  (hemangi kavi reel)सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये हेमांगी Kiss ची बाराखडी ( kiss barkhadhi ) सांगताना दिसत आहे. ही बारखडी काय आहे आणि सोशल मीडिया ट्रेंड काय आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. हेमांगी कवी तिच्या इन्स्टावर एक रील शेअर करत म्हटले आहे की, Kiss ची बाराखडी .. व तिने पुढं म्हटलं आहे की, फिसफिस चिक चिक मुहं मुहं आह! .. ती तोंडाने देखील फिस चिक चिक मुहं मुहं आह!..असंच काहीसं म्हणताना दिसते आहे. याच्या शेवटी ती किस देखील देताना दिसत आहे. अनेक सेलेब्सनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. हेमांगीने देखील ट्रेंड फॉलो केला आहे. तिच्या या इन्स्टा रीलवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडत आहे. यासोबतच तिने #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman हे हॅशटॅग देखील दिले आहेत.
  इन्स्टाग्रामवर हेमांगीचे रील्स मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. यातच हेमांगीचा आणखी दोन रील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रीलमध्ये हेमांगीच्या अदा पाहायला मिळत आहेत. जांभळ्या रंगाची नऊवारी, पारंपारिक दागिने तसेच नाकात नथ अशा मराठमोळ्या लुकमध्ये हेमांगी दिसत आहे. यातच तिने हिंदी व मराठी गाण्यांवर व्हिडिओ केले आहेत. "इश्काचा बाण" या गाण्यावर हेमांगीने व्हिडीओ केला आहे. यात हेमांगीचा सुंदर लुक पाहायला मिळत आहे.शिवाय या पोस्टमध्ये हेमांगी लिहीते की, "हो हो...मराठी गाण्यावर ही केलंय रील"..सध्या तिच्या रीलच्या कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेत आहे.यासोबतच हेमांगीने "रुप सुहाना लगता है" या हिंदी गाण्यावरही नऊवारीत भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडीओंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. वाचा : Bigg Boss Marathi 3 मुळे 'या' अभिनेत्रीला मोठा फटका ; हातातून गेला पहिला सिनेमा 'बाई, बुब्स आणि ब्रा' या पोस्टमुळे आली होती चर्चेत मागच्या काही दिवसापूर्वी हेमांगी कवीची एक फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली होती. महिलांनी ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली. किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात, असं हेमांगीनं म्हटल होते. वाचा : अंकिता लोखंडेची बहीण आहे तिच्यापेक्षाही बोल्ड; ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं होतं सर्वांचं लक्ष बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो! मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! ..अशा शब्दात हेमांगीने तिचे मत मांडले होते. तिच्या यो पोस्टवर सर्वसामन्या जनता ते अनेक मोठमोठ्या कलाकारांनी देखील प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published: