अंकिता लोखंडेची बहीण आहे तिच्यापेक्षाही बोल्ड; ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं होतं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजावर सर्वच घायाळ होतात. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे, अंकिताची बहीणसुद्धा तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजावर सर्वच घायाळ होतात. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे, अंकिताची बहीणसुद्धा तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. आज आपण तिच्याबद्दलच जाणून घेणार आहोत
2/ 6
अंकिता लोखंडेच्या बहिणीचं नाव आशिता शाहू असं आहे. खरं सांगायचं तर ती अंकिताची कजिन आहे. मात्र या दोघींमध्ये सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम आहे. या दोघीही एकमेकांच्या फारच जवळ आहेत. दोघी सतत सोशल मिडियावर आपले फोटो शेअर करत असतात.
3/ 6
काही महिन्यांपूर्वीच आशिताने आपलं ग्लॅमरस फोटोशूट करत मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला होता. तिचे फोटो पाहून सर्वच लोक घायाळ झाले होते. ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत आशिता अंकितापेक्षा अजिबात कमी नाही. तीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
4/ 6
आशिताने फोटोशूट केल्यानंतर अंकिताने एक इमोशनल पोस्ट तिच्यासाठी लिहिली होती. अंकिताने तिचं ग्लॅमरस जगतात स्वागत केलं होतं. मात्र ती चित्रपट की मालिका कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर करणार याबद्दल काहीच स्पष्ट केललं नव्हतं.
5/ 6
मात्र अंकिताने तिला शुभेच्छा देत नेहमीच आपल्या आई वडिलांना गर्व वाटावं असं काम कर असा प्रेमळ सल्ला दिला होता. तसेच तू आज तेच करत आहेस जे तुला सुरुवातीपासूनच करायचं होतं त्यामुळे मी खूप आनंदी असलायचं म्हटलं होतं
6/ 6
अशिता इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. शिवाय ती अनेकवेळा आपले फॅमिली फोटोही शेअर करत असते. स्टिच ती नेहमीच अंकितासोबत वेळ घालवताना दिसून येते. अनेकवेळा ती तिच्या सेटवरसुद्धा तिला भेटायला जाते.