मुंबई, 11 मे- सध्या मनोरंजन सृष्टीत अनेक गुड न्यूज समोर येत आहेत. एकेकीकडे काही कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकार नव्या पाहुण्याचं स्वागत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने (Minakshi Rathod) आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर चाहते फारच आनंदी झाले होते. या अभिनेत्रीला नुकतंच कन्यारत्न (Blessed With Baby Girl) प्राप्त झालं आहे. अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी आपण आई होणार असल्याची माहिती दिली होती. सोशल मीडियावर तिनं तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम प्रेग्नेन्सी ग्लो आला होता. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये तिने हे फोटो शेअर केले होते. तिनं फुलांनी सजलेल्या झोपळ्यावर बसून हे फोटो काढले होते. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. नुकतंच राजश्री मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठमोळं सेलिब्रेटी कपल असणाऱ्या मीनाक्षी राठोड आणि कैलाश वाघमारे यांचा फोटो शेअर करत त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याचं जाहीर केलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( sukh mhanje nakki kay asta ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखानींही लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली होती. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे. पण मीनाक्षीने तिच्या खास खट्याळ अंदाजाने या भूमिकेला विनोदी टच दिला होता.