Home /News /entertainment /

वयाच्या 83व्या वर्षी कमबॅक बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, एकेकाळी बोल्डनेसमुळे गाजवला मोठा पडदा

वयाच्या 83व्या वर्षी कमबॅक बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, एकेकाळी बोल्डनेसमुळे गाजवला मोठा पडदा

यावेळी हेलन चित्रपट किंवा मालिकेच्या माध्यमातून नाही, तर ओटीटीवर (Actress Helen web series) झळकणार आहेत. ब्राऊन नावाच्या वेब सीरीजमध्ये (Brown web series) त्या करिश्मा कपूरसोबत दिसतील.

मुंबई, 11 मे: ज्येष्ठ अभिनेत्री आणि डान्सर असलेल्या हेलन यांचे (Actress Helen) देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जबरदस्त डान्स आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हेलन (Actress Helen Comeback) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यावेळी हेलन चित्रपट किंवा मालिकेच्या माध्यमातून नाही, तर ओटीटीवर (Actress Helen web series) झळकणार आहेत. ब्राऊन नावाच्या वेब सीरीजमध्ये (Brown web series) त्या करिश्मा कपूरसोबत दिसतील. दहा वर्षांनी येणार स्क्रीनवर 83 वर्षांच्या हेलन यापूर्वी दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या ‘हिरॉईन’ (Heroine) चित्रपटात दिसल्या होत्या. यानंतर सुमारे 10 वर्षांनी त्या स्क्रीनवर कमबॅक (Actress Helen on OTT) करणार आहेत. ‘ब्राऊन – दी फर्स्ट केस’ या वेब सीरिजमध्ये करिश्मा कपूर (Karishma Kapoor web series) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच हेलनही या सीरिजमध्ये झळकतील. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा-...म्हणून धर्मवीरच्या ट्रेलर लाँचवेळी Salman Khan ने स्टेजवर काढले शूज, चाहते करतायंत कौतुक; पाहा VIDEO सेटवर पुन्हा येणं रोमांचक याबाबत बोलताना हेलन (Actress Helen) म्हणाल्या, ‘सेटवर पुन्हा येणं हे रोमांचक होतं. जेव्हा पहिल्यांदा या सीरिजबद्दल माझ्याशी संपर्क साधला गेला, तेव्हा स्क्रिप्ट समजणं मला अगदी सोपं गेलं. ही कथा एक रोमांचक क्राइम ड्रामा आहे. यातील माझ्या पात्राने स्वतःची अशी ओळख तयार केली आहे. त्यामुळे त्या पात्राशी कनेक्ट होणं सहज शक्य झालं. सेटवर परत येणं मी अगदी एंजॉय करत आहे.’ काय आहे ही सीरिज? ‘ब्राऊन – दी फर्स्ट केस’ ही वेब सीरिज अभीक बरूआ यांच्या ‘सिटी ऑफ डेथ’ (City of Death) या पुस्तकावर आधारित आहे. कोलकाता शहरात घडणारी ही एक क्राइम थ्रिलर कथा आहे. या सीरिजमध्ये अभिनेता सूर्य शर्मादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे वाचा-शाहिद कपूर, ईशान आणि कुणाल खेमूची बॉईज गॅंग निघाली रोड ट्रीपवर, बाईकवर फिरणार 'हा' देश अगदी कमी वयात पदार्पण हेलन यांनी अगदी कमी वयात सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. अवघ्या 19व्या वर्षी त्यांना पहिला ब्रेक मिळाला. ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्यामुळे हेलन यांना खास प्रसिद्धी मिळाली. यानंतर हेलन (Actress Helen songs) यांचा यशस्वी प्रवास सुरू झाला. आतापर्यंत त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हेलन यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री (Padma Shri Helen) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच, त्यांना फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डही देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या जीवनावरून प्रेरणा घेत चार चित्रपट आणि एक पुस्तकही लिहिले गेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून हेलन चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. मात्र, आता पुन्हा ब्राऊन वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांना पडद्यावर पाहता येणार आहे.
First published:

Tags: Entertainment, OTT, Web series

पुढील बातम्या