मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शर्मिष्ठा राऊत खास व्यक्तीसाठी खास पोस्ट: लिहिण्यामागे 'हे' आहे कारण

शर्मिष्ठा राऊत खास व्यक्तीसाठी खास पोस्ट: लिहिण्यामागे 'हे' आहे कारण

आज देखील शर्मिष्ठा राऊतने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास दिवसाचे महत्त्व साधत एक पोस्ट लिहिली आहे.

आज देखील शर्मिष्ठा राऊतने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास दिवसाचे महत्त्व साधत एक पोस्ट लिहिली आहे.

आज देखील शर्मिष्ठा राऊतने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास दिवसाचे महत्त्व साधत एक पोस्ट लिहिली आहे.

मुंबई , 11 ऑक्टोबर : 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमातून चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शर्मिष्ठा राऊत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. तिचे काही फोटो तसेच आगाीम प्रोजेक्ट याबद्दलची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज देखील शर्मिष्ठा राऊतने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास दिवसाचे महत्त्व साधत एक  (first marriage anniversary)पोस्ट लिहिली आहे. यासोबतच या व्यक्तीसोबतचे काही सुखद क्षण  (sharmishtha raut and  tejas desai ) म्हणजे फोटो देखील शेअर केले आहेत.

शर्मिष्ठा राऊतचा लग्नाचा आज पहिला वहिला वाढदिवस आहे. शर्मिष्ठा राऊतने मागील वर्षी 11 ऑक्टोबर रोजी तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली होती. तिच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित शर्मिष्ठाने नवऱ्यासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहित त्याच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

शर्मिष्ठाने म्हटले आहे की, आज 11 ऑक्टोबर, 1 वर्षापूर्वी आपल आजच्या दिवशी लग्न झाल.. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस.. गेल्या वर्षभरात माझ्याशी मैत्री निभवण्यासाठी, माझ्याशी प्रियकरासारखा वागण्यासाठी, मला माझ्या प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करण्यासाठी, माझ्यावर नितांत प्रेम करण्यासाठी, माझे लाड करण्यासाठी, माझे हट्ट पुरवण्यासाठी, भांडण झाल तर मनवण्यासाठी, माझा गॉसिप पार्टनर बनण्यासाठी etc etc.. खूपखूप Thankyou तेजस ..असाच कायम सोबत रहा.. I cannot imagine my life without you..., अशा अशायची तिने नवऱ्यासाठी पोस्ट लिहित त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. चाहत्यांनी देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा : Navratri च्या पाचव्या दिवशी ही मराठमोळी अभिनेत्री दिसली बंगाली देवीच्या रुपात, पाहा खास फोटो

शर्मिष्ठा आणि तेजसेचे आहे अरेंज मॅरेज

तेजस हा 'बोस' कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने सांगितले होते की, 'आमचे अरेंज मॅरेज असले, तरी हे 'लव्ह मॅरेज' आहे असेच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते. त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी होकार दिला.'दिल तो पागल है' सिनेमासारखे फिल्मी काहीसे झाले. तुम्हाला ते आतून वाटते… हाच आपला 'मिस्टर राईट' आहे, याचा कौल अंतर्मनाने मला दिला. यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली

शर्मिष्ठाचे हे दुसरे लग्न

शर्मिष्ठाचे तेजससोबतचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्यासोबत झाले होते. पण काही कारणांमुळे त्यांचा संसार टिकू शकला नाही. या गोष्टींचा स्वत: शर्मिष्ठाने 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये असताना खुलासा केला होता. शर्मिष्ठा आणि अमेय यांचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांच्या परवानगीने त्याचे लग्न झाले होते. मात्र आयुष्यात काही निर्णय चुकतात तसा लग्नाचा निर्णय चुकल्याचे तिने या शोममध्ये सांगितले होते.

वाचा : VIDEO : 'ही बया काय...'; उर्फी जावेदला विमानतळावर ट्रान्सपरंट ब्रालेटमध्ये पाहून नेटकरी भडकले

या भूमिकांमुळे शर्मिष्ठा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली

शर्मिष्ठाने 'मन उधाण वाऱ्याचे‘मधील साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी‘मध्ये तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये देखील शर्मिष्ठा दिसली होती. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने काम केले आहे. 'जो भी होगा देखा जयेगा', 'टॉम अँड जेरी', 'बायको असून शेजारी', 'शंभू राजे' या नाटकात शर्मिष्ठाने काम केले आहे. फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv actress, TV serials