मुंबई, 10 ऑक्टोबर : ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ मधून बाहेर आल्यापासून उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच या बोल्ड फोटोमुळे अनेकदा ती सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल देखील होती. आता पुन्हा एकदा उर्फी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. मात्र, यावेळी तिला नेटकऱ्यांनी विमानतळावर असल्यामुळे ट्रोल केले आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा बोल़्ड अवतार पाहून चाहते मात्र चकीत झाले आहेत.
उर्फी जावेदला अनेकदा विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. उर्फीने क्रीम रंगाचा ओपन कोट आणि ट्रान्सपरंट ब्रालेट परिधान केले आहे. ब्रालेट मधला उर्फीचा हा लुक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.उर्फी नेहमीप्रमाणे स्टायलिश दिसते आहे.पापाराझींना पाहिल्यानंतर ती फोटोसाठी पोझ देताना देखील दिसत आहे. मात्र नेटकऱ्यांना मात्र तिचा हा बोल्ड लुक आवडलेला नाही व तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी यावेळी उर्फीला फक्त तिच्या कपड्यांमुळे नाही तर ही नेहमी विमानतळावर असते म्हणजे ही काय इथेच कामाला आहे काय... असं म्हणतं ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “अरे ही वेडी बाई.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हिला कोण ओळखत नाही, लोकप्रियतेसाठी फक्त विमानतळावर जाते.” तिसरा नेटकरी म्हणाला, “या मुलीला लाज वाटली पाहिजे ती मुस्लीम आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “स्पष्टपणे दिसत आहे. कोट बाजुला घेत ती ब्रालेट दाखवते. बेड रूममध्ये घालणारे कपडे विमानतळावर घालते आणि ते पण फोटो काढण्यासाठी दाखवते. कुंद्राला भेट,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केले आहे.
वाचा :ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये Mithun Chakraborty ची सून Madalsa sharma ने वाढवला सोशल मीडियाचा पारा
काही दिवसापूर्वी उर्फी जावेदने त्याच्या इन्स्टावर बॅकलेस टॉपमधील काही फोटो पोस्ट केले होते. उर्फीने अतिशय स्टायलिश बॅकलेस टॉप परिधान केल्याचे या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. याच फोटोमध्ये ती पाठ दाखवताना दिसत आहे. उर्फीचा हा टॉप काहीसा रुमालसारखा स्टाईल असणारा आहे.
वाचा :Bigg Boss Marathi 3 च्या घरातील ही मीनल शाह नक्की आहे तरी कोण?
उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. तिने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या टीव्ही शोमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासह तिने 'चंद्र नंदनी', 'सात फेरे की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जिजी माँ', 'दयान', 'ये रिश्ता क्या कहलाता है', यामध्ये काम केले आहे . त्यानंतर ती पुन्हा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली व चर्चेत देखील आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment, Tv actress, TV serials