Home /News /entertainment /

Navratri च्या पाचव्या दिवशी ही मराठमोळी अभिनेत्री दिसली बंगाली देवीच्या रुपात, पाहा खास फोटो

Navratri च्या पाचव्या दिवशी ही मराठमोळी अभिनेत्री दिसली बंगाली देवीच्या रुपात, पाहा खास फोटो

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ही अभिनेत्री दिसली बंगाली देवीच्या रुपात

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ही अभिनेत्री दिसली बंगाली देवीच्या रुपात

शारदीय नवरात्रौत्सवाचे (Navratri 2021)औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar)गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे.

    मुंबई, 11 ऑक्टोबर: शारदीय नवरात्रौत्सवाचे (Navratri 2021)औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar)गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे. दरम्यान आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून अपूर्वाने बंगाली देवीचे रुप धारण केले आहे. रात्रीत खेळ चाले शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीनेदेखील (navratri colours 2021) सहभाग दर्शवला आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना देखील दिसत आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. May be a close-up of 1 person and text यानिमित्त तिने बंगाली देवीचे रुप धारण केले आहे. 'बंगाली देवी त्रिनयन दुर्गामाता, त्रिपूरा अगरतला'' अशी कॅप्शन देत तिने देवीच्या रुपातील काही फोटो शेअर केले आहेत. May be a close-up of 1 person शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते. May be a close-up of 1 person दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले होते. तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धरण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले होते.चौथ्या दिवशी अपूर्वाने जगदंबा मातेच्या रुपात पाहायला मिळली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Apurva nemlekar, Marathi actress, Marathi entertainment, Navratri

    पुढील बातम्या