जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Maasa Short Film: 'मासा'ची हॉलिवूडवारी; अमृता सुभाषच्या शॉर्टफिल्मचं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग

Maasa Short Film: 'मासा'ची हॉलिवूडवारी; अमृता सुभाषच्या शॉर्टफिल्मचं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग

Maasa Short Film: 'मासा'ची हॉलिवूडवारी; अमृता सुभाषच्या शॉर्टफिल्मचं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग

नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर दिग्दर्शित आणि अमृता सुभाष अभिनीत मासा या शॉर्ट फिल्मची हॉलिवूड फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंगसाठी निवड झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 ऑगस्ट:  मराठी सिनेमा सातासमुद्रापार जाऊन आपला अटकेपार झेंडा रोवत असताना आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष अभिनीत ‘मासा’ ही शॉर्ट फिल्म हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. मासा या शॉर्ट फिल्मचं ‘हॉलिवूड आंतरराष्ट्रीय फिल्म डायव्हर्सिटी फेस्टिव्हल’मध्ये स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. या शॉर्ट फिल्मचं खास वैशिष्ट्य म्हणजे फिल्ममध्ये अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष या माय लेकीच्या जोडीनं नेहमीप्रमाणे दमदार काम केलं आहे. तसंच अनेक वर्ष नृत्यदिग्दर्शनात मोलाची कामगिरी करणारी नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरनं या मासाचं दिग्दर्शन केलं आहे. नृत्याच्या नजरेतून एखाद्या कलाकृतीकडे पाहणारी फुलवा आता दिग्दर्शन क्षेत्रात उतरली असून तिची पहिलीच कलाकृती सातासमुद्रापार पार पोहचली आहे. मासाची दिग्दर्शिका फुलवानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिनं म्हटलंय, ‘मासा हॉलिवूडमध्ये जाणार. आपली शॉर्ट फिल्मची हॉलिवूड आंतरराष्ट्रीय डायव्हर्सिटी फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे’.  मासाचं शनिवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता हॉलिवूडच्या  कॉम्पलेक्स थिएटर अँड स्टुडिओमध्ये पॅसिफिक वेळेनुसार मासाचं स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. सिनेमानं गाठवलेल्या या इतक्या मोठ्या पल्ल्यानंतर कलाकार आणि संपूर्ण टीमचं कौतुक होत आहे. हेही वाचा - Nagapanchami 2022: नेटकऱ्यांनी अभिज्ञाला दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा; नक्की काय आहे प्रकरण?

जाहिरात

मासा विषयी सांगायचं झालं तर  नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं दिग्दर्शन क्षेत्रातील हे पदार्पण आहे.  या आधी या शॉर्ट फिल्मची मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हनं ( मिफ्फ) मध्येही निवड करण्यात आली. शॉर्टफिल्मचं लेखन अभिनेता संदेश कुलकर्णीनं केलंय. तर संगीतकार निलेश मोहरीरनं सिनेमाला संगीत दिलंय. फिल्ममध्ये अमृता सुभाषसह संदेश कुलकर्णी, वज्र पवार आणि नयन जाधव हे कलाकारही आहेत. शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्री अमृता सुभाष केतकी नावाची व्यक्तिरेखा साकारतेय तर अभिनेत्री ज्योती सुभाष हा केतकीची सासू रखमाची भूमिका साकारत आहेत. ऐन तारुण्यात नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीची आणि आईची भावस्पर्शी कहाणी दाखवण्यात आली आहे. अनेक फेस्टिव्हलमध्ये या शॉर्ट फिल्मचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. लवकरच ही शॉर्ट फिल्म सर्वसामान्य प्रेक्षकांनाही पाहायली मिळाली अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात