नुकताच अभिनेता रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ खूपच खास आहे. कारण या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलियाची दोन्ही मुले 'सुखकर्ता... दुःखहर्ता' हि बाप्पाची सुंदर आरती म्हणत आहेत. दोघेही खूपच गोड आरती म्हणत आहेत. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. तसेच या व्हिडीओवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा येत आहेत. शिवाय हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला आहे. (हे वाचा:श्रेया बुगडेने शेयर केले बाप्पासोबतचे सुंदर PHOTO; म्हणाली वर्षभर....) सध्या सर्वत्र गणरायाच्या आगमनाने आनंदी वातावरण आहे. प्रत्येक भक्त बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. बाप्पाला 'विघ्न्ह्रहर्ता'असंही म्हटलं जातं. प्रत्येकजण बाप्पाकडे या परिस्थितून बाहेर पडण्यास मार्ग दाखविण्याची प्रार्थना करत आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. मात्र बाप्पाच्या येण्याने एक सकारात्मक ऊर्जा सर्वत्र निर्माण झाली आहे. (हे वाचा:'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेच्या घरीही बाप्पा विराजमान; पाहा अशी केली पूजा) तसेच रितेश आणि जिनिलियाच्या घरातदेखील हे आनंदाचं वातावरण दिसत आहे. हे कपल सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतं. दोघेही सतत आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.