मुंबई, 25 एप्रिल- मराठी नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, बॉलिवूड अशा सर्वच ठिकाणी अभिनेता सिद्धार्थ जाधव ( Siddharth jadhav ) हे नाव गाजलेले आहे. कलेच्या प्रत्येक मंचावर त्याने आपल्या कलेची जादू दाखवली आहे. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तो नेहमीच त्याच्या अतरंगी फोटोशूटमुळे चर्चेत असतो. शिवाय तो त्याच्या कुटुंबासोबत देखील काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. नुकतीच सिद्धार्थनं ( siddharth jadhav daughter ) त्याच्या लाडक्या लेकींसाठी एक पोस्ट लिहिली आहे. सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. सिद्धार्थनं त्याच्या लाडक्या लेकींसोबतचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आयुष्य….आपण “कोणासाठी” जगतो हे खूप महत्त्वाचं असतं.. … my life… my daughters… ❤️स्वरा आणि इरा… ❤️ 💙 💜 💖#swarajadhav #irajadhav #बापलेकीचीमज्जा #बाबा #आपलासिध्दू #siddharthjadhav #fatherdaughter #love..त्याची लेकींसोबतची धमाल पाहून त्याला कूल डॅडी म्हणत त्याचे कौतुक केले आहे. सिद्धार्थ जाधवला दोन मुली आहेत. यापैकी एकीचं नाव इरा तर दुसरीचं नाव स्वरा आहे. वाचा- ‘लॉकडाउनमुळे व्हिडिओग्राफर नव्हता…’ अशा स्थितीत केलं होतं क्षितीश -ऋचानं लग्न यापूर्वी देखील सिद्धार्थनं त्याच्या लाडक्या लेकींसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानं या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, आयुष्य आनंदाने जगण्याचं “एक” नाही तर “दोन” कारणं… माझी life line … 💓 💓स्वरा आणि इरा… ❤️ 💙 💜 💖swarajadhav #irajadhav #बापलेकीचीमज्जा #बाबा #आपलासिध्दू #siddharthjadhav #fatherdaughter #love ..त्याच्या या सुंदर कुटुंबाचं चाहत्यांनी देखील कौतुक केलं होतं. वाचा- रिंकू राजगुरूला झालंय प्रेम….!विश्वास बसत नसेल तर हा क्यूट व्हिडिओ नक्की पाहा सिद्धार्थने 10 मे 2007 मध्ये तृप्ती अक्कलवार हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. हे जोडपं परफेक्ट कपल म्हणून लोकप्रिय आहे.मुलगी इरा आणि तो सतत मजा मस्ती धमाल करत असतात. इन्स्टाग्रामवर बापलेकीचे मस्ती करतानाचे अनेक व्हीडिओ त्याचं उदाहरण आहे.
सिद्धार्थ जाधवनं मराठीसह हिंदी चित्रपट देखील काम केलं आहे. त्यानं सिम्बा या चित्रपटात सबइन्सपेक्टर संतोष तावडेची भूमिका साकारली होती. ‘राधे’ या चित्रपटात त्याने रणजीत मावानीची भूमिका केली होती. तर ‘गोलमाल रिटर्न्स’मध्येही सिद्धीर्थने लक्कीच्या असिस्टंटची भूमिका केली होती. भूमिका कोणतीय असो सिद्धार्थ त्याच्या अभिनयाने नेहमीचं प्रेक्षकांचं मन जिंकत असतो.