मुंबई, 25 एप्रिल- दोन वर्ष झालं देशावर कोरोनाचं सावट आहे. या काळात अनेकांनी साखरपुडा, लग्न समारंभ देखील उरकून घेतले. कोरोनोमुळे मात्र अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सुरक्षा आणि काटेकोर नियमावली पाळावी लागत होती. याच काळात 25 एप्रिल 2021 मध्ये अभिनेता क्षितीश दाते**(Kshitish Date)** आणि ऋचा आपटे (Rucha apte) यांचा विवाहसोहळा साधेपणानं झाला. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. यानिमित्त ऋचा आपटेने लग्नाचा व्हिडिओ शेअर काही आठवणी शेअर केल्या आहेत. अभिनेत्री ऋचा आपटेने इन्स्टाला तिच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, 1 वर्ष झालं 😱25 एप्रिल 2021ला लॉकडाउन असल्याने व्हिडिओग्राफर बोलावला नव्हता. उपस्थित लोकांनीच लग्नाचे व्हिडिओज काढले. त्यातून तयार केलेली ही एक छोटी झलक!#firstanniversary #wedding #marathiwedding #lockdownwedding #indianwedding #1yearcomplete #timeflies ऋचा आपटेने शेअर केलेल्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दोघही खूप सुंदर दिसत आहेत. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- Superstar Singer2 साठी पवनदीप-अरुणिता घेतात एवढे मानधन, सायली कांबळेही मागे नाही ऋचा आणि क्षितिश ह्या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्षितिशची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातली गण्या ही भूमिका प्रचंड गाजली. हे दोघेही ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र दिसले होते.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या काही भागांमध्येही ती दिसली होती. तसंच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही तिने कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.
2021 मध्ये अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले आहेत. मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांचे 2021 मध्ये लग्न झाले. या सर्वांचा लग्नसोहळा आणि लग्नविधींचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.