मुंबई 16 मे : सीसीएल (CCL) म्हणजेच ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ संपून काही दिवस झाले असले तरीही अभिनेता सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) एक व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. सिद्धार्थने एक षटकार मारला होता. जो प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला होता. तर यामुळे अनेकांना धोनीच्या (MS Dhoni) षटकाराची आठवण ही झाली होती.
गेला महिनाभर आयपीएलचं (IPL) वार देशभर घुमत होतं. पण सध्या आयपीएल मॅचेस स्थगीत करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॅचेस स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला होता. तेव्हा आता क्रिकेच प्रेमी जुन्या व्हिडीओस वर समाधान मानत आहेत.
View this post on Instagram
सीसीएल (CCL) मधून वीर मराठी या संघातून सिद्धार्थ खेळत होता. सिद्धार्थ ने यावेळी एक षटकार मारला होता. त्यामुळे अनेकांनी सिद्धार्थचं कौतुकही झालं होत. वीर मराठी (Veer Marathi) ही टिम अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) आहे. तर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या टिमचे कॅप्टन आहेत.
View this post on Instagram
सिद्धार्थ नुकताच प्रदर्शित झालेला ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) या चित्रपटात झळकला होता. यातील त्याच्या कामाचीही विशेष चर्चा होत आहे. त्याने ‘रणजीत मवानी’ हे पात्र साकारलं होतं. सिद्धार्थच्या हातात आणखी काही चित्रपट आहेत. लवकरच तो तीन नव्या चित्रपटांतही झळकणार आहे.
कोरोनामुळं काय दिवस आले? टीव्हीवर झळकणारे कलाकार विकतायेत रस्त्यावर भाजी
‘बाल भारती’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटांत तो दिसणार आहे. मागील वर्षी तो ‘धुरळा’ या मराठी चित्रपटातही दिसला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.