जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO:रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी'मधून रणवीरचा रोल कट करण्याची दिली धमकी; वाचा नेमकं काय घडलं

VIDEO:रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी'मधून रणवीरचा रोल कट करण्याची दिली धमकी; वाचा नेमकं काय घडलं

Ranveer Singh

Ranveer Singh

‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रणवीरचा कॅमिओ आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,27ऑक्टोबर- रणवीर सिंगचा (Ranvir Singh) ‘द बिग पिक्चर**’ (The Big Picture)** हा शो प्रेक्षकांना आवडला आहे. या शोमध्ये सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटी दिसले आहेत. या वीकेंडला ‘द बिग पिक्चर’च्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिसणार आहे. रणवीर सिंगने होस्ट केलेल्या या शोमध्ये चित्रपट निर्माते त्यांच्या पुढच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतील, ज्यात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रणवीरचा कॅमिओ आहे.

जाहिरात

कलर्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी एका प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं रणवीरला सांगितले की, जर त्याने प्रश्नाचे अचूक उत्तर दिलं नाही तर त्याची प्रतिष्ठा पणाला लागेल. स्क्रीनवरील प्रश्नांकडे बघत रोहित रणवीरला म्हणाला, ‘यार ये वाला नहीं आया, पण हे खूप अपमानास्पद होईल.’ रणवीर हसला आणि म्हणाला, ‘हो, हा अपमान होईल. त्यामुळे तुला योग्य उत्तर द्यावंच लागेल. त्यावर रोहित म्हणतो ‘तू माझ्यावर दबाव आणत आहेस.’ (**हे वाचा:** Sooryavanshi: चित्रपटाचं पहिलं गाणं ‘Aila Re Aillaa’रिलीज; अक्षय … ) दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवीरला समर्थनासाठी विचारलं, ‘तुम्ही मदत करणार नाही का?’ यावर अभिनेत्याने आपल्याला यासाठी परवानगी नसल्याचं सांगत मदत करण्यास नकार दिला. जर रणवीरने त्याला मदत केली नाही तर तो ‘सूर्यवंशी’मधून त्याची भूमिका कट करेल, असं रोहितने पुन्हा रणवीरला संकेत दिले. तो म्हणतो, ‘बघ, अजून ‘सूर्यवंशी’ रिलीज झाला नाही. यावर रणवीर त्याला नाही, नाही, नाही.’ म्हणत शांत व्हायला सांगतो. हा एक फारच मजेशीर प्रसंग होता. रणवीर आणि रोहित या दोघांचं हे संभाषण ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हास्या पिकतो. **(हे वाचा:** कतरिनाचा विषय हार्ड! मराठीत ‘भावा’ म्हणत केली रणवीर सिंहची बोलती बंद … ) ‘सूर्यवंशी’ ची पोलिस थीम लक्षात घेऊन अनेक पोलिस प्रेक्षकांमध्ये बसल्याचंही प्रोमोमधून समोर आलं आहे. रोहितने यापूर्वी पोलिसांवर आधारित तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.त्याने अजयसोबत ‘सिंघम’ (2011) आणि ‘सिंघम रिटर्न्स’ (2014) बनवले आहेत. पुन्हा रणवीरसोबत ‘सिम्बा’ बनवला होता. ‘सूर्यवंशी’ हा त्याचा चौथा चित्रपट आहे. जो अक्षयला पोलीस म्हणून नवीन ओळख देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात