मुंबई, 2 एप्रिल : एका फेसबुक पोस्टमुळे (facebook post) अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शशांक सध्या झी मराठी (zee Marathi) वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ (pahile na mi tula) या मालिकेत काम करत आहे. त्यात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. शशांक ची ही पहिलीच खलनायकाची भूमिका आहे. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. तर हा बदल त्यानेही स्वीकारला आहे. पण एक अश्लिल भाषेतील कमेंट त्याच्या फेसबुक पोस्ट वर एका युझर ने केली होती. आणि त्यानंतर शशांक मात्र फारच संतापला.
काय होती त्या युझर ची कमेंट
यानंतर शशांक फारच संतापला व त्याने त्या युझर ला कमेंटमध्ये रिप्लाय दिला. व कलाकारांनाही रिस्पेक्ट द्या पुण्य लाभेल अशी कमेंट शशांक ने केली पण त्या युझर ने शशांक ला प्रत्युत्तर देत "एकंदरित आपणास प्रचंड राग आलेला दिसत आहे. कलाकारांनी पण अभिनय करावा, पाट्या टाकू नयेत आणि आपण काय पात्र रंगवून समाजाला काय देणं लागत आहोत याचं भान बाळगावं. वेळ काढून बाकीच्या कमेंट्स वाचल्यास नक्की डांबर कुठे आणि कुणाच्या चेहऱ्यावर आहे, हे दिसून येईल" असं म्हटलं. आणि त्यानंतर शशांक ने भली मोठी पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हटल शशांक ने त्या पोस्ट मध्ये
"मी काय म्हणतो, तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल ,तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अभिनय सुरु करा, आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघण्याची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, गोष्टला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. ही मालिका आहे.... अजून खूप गोष्ट बाकी आहे... "
शशांक सध्या 'पाहिले न मी तुला' या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. समरप्रताप असं या व्यक्तिरेखेचे नाव असून समर हा अतिशय क्रूर आणि स्वार्थी स्वभावाचा बॉस आहे. तर मानसी ही त्याच्या ऑफिस मध्ये काम करते. मानसी आणि अनिकेतच्या अफेअर विषयी माहित असल्याने तो मनूला म्हणजेच मानसीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.