अवश्य पाहा - स्टंटमनचा मुलगा झाला सुपरस्टार; पाहा बॉलिवूडमधील 'सिंघम'च्या खास गोष्टी राम चरण, जूनियर एनटीआर आणि आलिया भट्ट यांचे लूक प्रदर्शित झाले होते पण अजय चा लूक प्रतिक्षेत होता आणि त्याचही आता अनावरण झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. निर्मात्यांनी सोशल मिडीया वर मोशन पोस्ट शेअर करूण, LOAD... AIM... SHOOT...' असं लिहीत कॅप्शन (caption) दिलं आहे. अजय देवगन (Ajay Devgn) सोबत आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटातून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण (debut) करत आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. ती या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट दोन स्वतंत्रता सेनानी अलुरी सीताराम राजू आणि कोमरम भीम यांच्यावर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स पहायला मिळणार आहेत यात शंका नाही. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटात दिग्दर्शक एस एस राजा मौली यांनी अजय देवगन, राम चरण, जूनियर एनटीआर आणि आलिया भट्ट यासारखी तगडी स्टरकास्ट घेतली आहे. त्यामुळं चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 13 ऑक्टोबर 2021 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment