Home /News /entertainment /

'लक्ष्या'च्या आठवणीत सचिन पिळगांवकर झाले भावुक; Photo शेअर म्हणाले...

'लक्ष्या'च्या आठवणीत सचिन पिळगांवकर झाले भावुक; Photo शेअर म्हणाले...

मराठीतील दिग्गज अभिनेता(Marathi Actor) सचिन पिळगांवकर (Sachin pilagaonkar) यांनी नुकताच आपल्या सोशल मीडियावर दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेचा (Lakshmikant Berde) फोटो पोस्ट केला आहे.

    मुंबई, 20 मे-  मराठीतील दिग्गज अभिनेता (Marathi Actor)  सचिन पिळगांवकर (Sachin pilagaonkar) यांनी नुकताच आपल्या सोशल मीडियावर दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेचा (Lakshmikant Berde)  फोटो पोस्ट केला आहे. आणि त्याला ‘मिस यू लक्ष्या’ असं कॅप्शन सुद्धा दिलं आहे. हा फोटो निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या वाढदिवसाचा आहे. यावरून आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी त्यांच्या मनात किती ठळक आहेत, हेच पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपट सृष्टीला सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गज कलाकारंची साथ मिळाली आहे. यांच्या प्रत्येक चित्रपटांना हाउसफुल्लचा बोर्ड लागत असे. सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका ‘लक्ष्या’ यांनी मिळून अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत. जशी ऑन स्क्रीन यांची मैत्री होती. तशीच ऑफ स्क्रीनसुद्धा यांची घट्ट मैत्री होती. मात्र लक्ष्याच्या अवेळी जाण्यानं त्यांच्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. हे लोक प्रत्येक वेळी लक्ष्याला मिस करत असतात. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणण्या ऐवजी प्रत्येक व्यक्ती त्याला ‘लक्ष्या’ या नावनेच आठवते. कारण ‘लक्ष्या’ हे नाव प्रत्येकाला आपलंसं वाटतं. लक्ष्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांकडून सुपरहिटची पावती मिळाली आहे. (हे वाचा:बाबांच्या कुशीत विसावलेल्या या चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री) लक्ष्या, सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारे हे कलाकार जितके चित्रपटांत एकमेकांच्या जवळ  होते. तितकेच ते खऱ्या आयुष्यात सुद्धा जवळ होते. ‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत ते आजही आपल्या मैत्रीचे अनेक किस्से चाहत्यांशी शेयर करत असतात. (हे वाचा:The Family Man मधील सोज्वळ प्रियमणी खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस  ) सचिन पिळगांवकर यांनी नुकताच आपल्या फेसबुक अकाऊंटवर लक्ष्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो निवेदिता सराफ यांना केक भरवताना दिसत आहे. हा फोटो निवेदिता यांच्या वाढदिवसाचा आहे, असं सचिन यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फोटोला ‘miss u lkshya’ असं कॅप्शन दिलं आहे. हे वाक्य चं सर्व काही बोलून जातं, त्यामुळे यांच्या आयुष्यात लक्ष्याचं स्थान काय आहे याबद्दल जास्त बोलायची गरज नाही.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या