मुंबई, 12 मे- बालपण (Childhood) कोणाला नाही आवडत. प्रत्येक व्यक्तीसाठी आपलं बालपण तितकच खास असतं. प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणी जपत असतो. आणि त्या आठवणींना उजाळा देत असतो. मग ते सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार प्रत्येकांना बालपणात रमायला आवडत. आज असाच एक फोटो तुम्ही पाहात आहात. हा फोटो आहे मराठीतील एका उत्कृष्ट अभिनेत्रीचा. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Actress) आपली खास ओळख निर्माण केली आहे. ती उत्तम अभिनयासोबतचा आपल्या बोल्ड लुकसाठी नेहमीच चर्चेत असते. तर ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून पूजा सावंत (Pooja Sawant) आहे.
View this post on Instagram
पूजाने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बालपणीचा हा गोंडस फोटो शेयर केला आहे. हा फोटो चाहत्यांना सुद्धा खुपचं पसंत पडत आहे. सध्याच्या बोल्ड आणि हॉट पूजाचा हा बालपणीचा गोंडस फोटो चाहत्यांना तिच्या नव्याने प्रेमात पाडत आहे.
सध्याच्या पूजा बद्दल बोलायचं झालं तर, पूजा मराठीतील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पूजाने आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून पूजाने आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. त्यामुळेच तिचे असंख्य चाहते आहेत. अगदी कमी वयात पूजाने फार मोठ यश आपल्या पदरी पाडलं आहे.
View this post on Instagram
2010 मध्ये आलेल्या मल्टी स्टारर ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून पूजाने अभिनय सृष्टीत एन्ट्री केली होती. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, मनवा नाईक, भरत जाधव अशा तगड्या स्टार कास्ट असणाऱ्या चित्रपटात नवखी पूजा आपल्या अभिनयाने उठून दिसली होती. पूजाला बालपणापासूनचं नृत्य आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळे तिने शालेय वयापासूनच अनेक नृत्य आणि नाटकामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. इतकचं नव्हे तर त्यात अनेक पुरस्कार देखील पटकावले होते.
(हे वाचा: अनिकेत-मानसीचं लग्न मोडणार? 'पाहिले न मी तुला'मध्ये येतोय नवा ट्विस्ट )
2008 मध्ये पूजाने महाराष्ट्र टाइम्सच्या ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आणि त्यात ती विजेती सुद्धा ठरली होती. आणि या स्पर्धेमुळेच मराठी चित्रपटसृष्टीचे दार तिच्यासाठी खुले झाले होते. कारण या स्पर्धेमध्ये परीक्षक असणाऱ्या सचित पाटीलने तिला थेट ‘क्षणभर विश्रांती’ साठी विचारणा केली होती.
(हे वाचा:रोहनप्रीत-नेहा कक्करमध्ये तुफान राडा; नवरा-बायकोच्या हाणामारीचा VIDEO VIRAL )
पूजाने दगडी चाळ, झकास, निळकंठ मास्तर, पोस्टर बॉईज, सतरंगी रे यांसारख्या असंख्य चित्रपटात काम केल आहे. महत्वाच म्हणजे 2017 मध्ये पूजाने ‘लपाछपी’ या रहस्यमयी चित्रपटात काम केलं आहे. आणि या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार पूजाला मिळाला आहे. अशा या हरहुन्नरी पूजाचा हा बालपणीचा गोंडस फोटो चाहत्यांना आकर्षित करून घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.