जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'पाहिले न मी तुला' मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, लिहिली भावनिक पोस्ट

'पाहिले न मी तुला' मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, लिहिली भावनिक पोस्ट

'पाहिले न मी तुला' मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, लिहिली भावनिक पोस्ट

झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला (pahile na mi tila )या मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडळे (tanvi mundale) हिचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला **(pahile na mi tila )**या  मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडळे (tanvi mundale) हिचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर तन्वीने वडिलांसाठी भावनिक पोस्ट केली आहे. तन्वी मुंडळेने इन्स्टावर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु… see you whenever my time comes…” असे म्हणून आपल्या बाबांच्या आठवणीत तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे. वाचा :  ‘तारक मेहता..‘फेम ‘बबिता-टप्पू’चा खास फोटो झाला VIRAL; पुन्हा अफेयर्सच्या चर्चां तन्वी मुंडळे हिचे तिच्या बाबांशी असणारे नाते किती मैत्रीपूर्ण होते हे तिच्या पोस्टवरूनच समजते. माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू अशी भावना तिने आपल्या बाबांप्रति व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टवर मालिकेतल्या तिच्या सह कलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली आहे.

जाहिरात

तन्वी मुंडळे ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची आहे. कुडाळ येथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप तिने जॉईन केला आणि इथूनच अभिनयाची ओढ तिला लागली. पुढे पुण्यात ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले. अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. यातूनच “Colorफुल” हा तिचा पदार्पणातील पहिला मराठी चित्रपट ठरला मात्र अजूनही हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. वाचा : Hollywood चित्रपटाच्या सेटवर झालेल्या गोळीबारने प्रियांका चोप्रा चिंतीत…. या चित्रपटात काम केल्यानंतर महेश कोठारे यांनी तन्वीला आपल्या मालिकेत नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले. मात्र प्रेक्षकांच्या अल्पशा प्रतिसादामुळे आणि कथानक दमदार नसल्याने ही मालिका आटोपती घेण्यावर भर देण्यात आला. मात्र मालिकेतील तन्वीची भूमिका प्रेक्षकांना आवडूही लागली आणि तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकही केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात