Home /News /entertainment /

‘परत भोपळे चौक अवस्था’; ...अन् प्राजक्ता माळीवर आली भांडी घासायची वेळ

‘परत भोपळे चौक अवस्था’; ...अन् प्राजक्ता माळीवर आली भांडी घासायची वेळ

राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लॉकडाउन लावण्यात आलंय. शिवाय चित्रिकरणावरही बंदी आहे. याच पार्श्वभूमीवर प्राजक्ताने ही पोस्ट केली आहे.

  मुंबई 7 मे: प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या मधुर हास्यानं चाहत्यांना मोहित करणारी प्राजक्ता चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. यावेळी देखील तिनं असेच काही लक्षवेधी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अन् हे फोटो पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं पारंपारिक वेश परिधान केला असून ती चक्क भांडी घासताना दिसत आहे. मात्र या फोटोंपेक्षाही त्यावर दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणाली, “परत भोपळे चौक अवस्था (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गंमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली. ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया.” राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लॉकडाउन लावण्यात आलंय. शिवाय चित्रिकरणावरही बंदी आहे. याच पार्श्वभूमीवर प्राजक्ताने ही पोस्ट केली आहे. मात्र तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ही दोस्ती तुटायची नाय...; सलमान-आमिरची दुश्मनी कशी बदलली मैत्रीत?
  प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये काम केलं. ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ‘मेघा देसाई’ या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला ‘खो-खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Actress, Marathi actress, Photo viral, Tv serial

  पुढील बातम्या