Home /News /entertainment /

ही दोस्ती तुटायची नाय...; सलमान-आमिरची दुश्मनी कशी बदलली मैत्रीत?

ही दोस्ती तुटायची नाय...; सलमान-आमिरची दुश्मनी कशी बदलली मैत्रीत?

दोघांना एकमेकांचं तोंडही पाहायचं नव्हतं. मुलाखतींमध्ये ते एकमेकांचे वाभाडे काढायचे. परंतु दरम्यान अशी एक घटना घडली की ज्यामुळं हे शत्रूत्व मैत्रीत बदललं.

    मुंबई 7 मे: सलमान खान (Salman khan) आणि आमिर खान (Aamir khan) हे बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. सलमान आपल्या दमदार अॅक्शनसाठी ओळखला जातो. तर आमिर चित्रपटातील अनोख्या विषयांमुळं. दोघंही जवळपास दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करत आहेत. मात्र प्रतिस्पर्धी असतानाही दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. दोघंही आपलं व्यवसायिक आणि खासगी आयुष्य वेगवेगळं ठेवतात. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य एक काळ असाही होते जेव्हा सलमान व आमिर एकमेकांचे कट्टर शत्रू होते. (Salman-Aamir how to become friends) दोघांना एकमेकांचं तोंडही पाहायचं नव्हतं. मुलाखतींमध्ये ते एकमेकांचे वाभाडे काढायचे. परंतु दरम्यान अशी एक घटना घडली की ज्यामुळं हे शत्रूत्व मैत्रीत बदललं. 1994 साली अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या सेटवर दोघांचं भांडण झालं होतं. आमिर आपल्या कामाच्या बाबतीत फार गंभीर होता. परंतु सलमान मात्र तितक्या गंभीरतेने काम करत नव्हता. यामुळं दोघांमध्ये सतत मदभेद व्हायचे. शिवाय चित्रपटाच्या पटकथेवरुन देखील दोघांमध्ये वाजलं होतं. पाहता पहता या मतभेदांचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. दोघांनी एकत्र काम करण्यास नकार दिला. परिणामी चित्रपटाचं शूटिंग देखील एक-दिड वर्ष पुढे गेलं. अखेर निर्मात्यांचं नुकसान थांबवण्यासाठी दोघांनी चित्रपट पूर्ण केला. पण तो चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर जवळपास सात वर्ष दोघांनी एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही. सुशांतच्या आयुष्याचा धडा आता लहान मुलं शिकणार; शालेय पुस्तकात झाला समावेश परंतु 2001 मध्ये आमिरचा रीना दत्तासोबत घटस्फोट झाला. त्यावेळी तो डिप्रेशनमध्ये होता. भरपूर दारु प्यायचा. या प्रसंगाविषयी सलमानला कळलं अन् स्वत:हून त्यानं आमिरची भेट घेत त्याची विचारपूस केली. विशेष म्हणजे त्यानं नैराश्येतून बाहेर यायला देखील त्याला मदत केली. पडत्या काळात सलमाननं त्याला दिलेला मानसिक आधार दिला. अन् यामुळं दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. दोघांनाही एकमेकांची विचारसरणी कळली. सलमाननं अनेकदा म्हटलंय आमिरमुळं त्याला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोण मिळाला. अशा प्रकारे कधीकाळी कट्टर शत्रू असलेले हे दोन सुपरस्टार आज बॉलिवूडमधील खास मित्र म्हणून ओळखले जातात. हा किस्सा आमिरने करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood actor, Salman khan

    पुढील बातम्या