मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लशीचे दोन्ही डोस घेऊनही मोहन जोशी यांना कोरोनाची लागण; मालिकेच्या शूटिंगसाठी होते गोव्यात

लशीचे दोन्ही डोस घेऊनही मोहन जोशी यांना कोरोनाची लागण; मालिकेच्या शूटिंगसाठी होते गोव्यात

मालिकांचं चित्रिकरण थांबलं, ते इतर राज्यांत गेलं. पुरेशी काळजी घेऊनही कलाकार आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.. त्यातलं  ताजं नाव आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी.

मुंबई 10 मे :  कोरोनाचा हाहाकार थांबण्याचं नाव घेत नाही. देशभरात कोरोनाची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना कोरोणाची लागण झाली आहे. यात अनेक कलाकार , सेलिब्रिटींचाही समावेश आहे. आता मराठी मालिकांच्या जगाला एक धक्का आणखी बसला आहे. सुरुवातीला मालिकांचं चित्रिकरण थांबलं, ते इतर राज्यांत गेलं. पुरेशी काळजी घेऊनही कलाकार आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.. त्यातलं  ताजं नाव आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. मराठी सिनेसृष्टीतील या लोकप्रिय कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे.

जोशी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. Insta story च्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांनाही काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे.

मोहन जोशी हे सध्या अग्गबाई सूनबाई या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. त्यात ते आजोबांची भूमिका साकारत आहेत.

पाहा मजेशीर Video; स्वामींचं नाव घेत अंकिता लोखंडेनं घेतली कोरोना लस

मालिकेचं शूटींग हे गोव्यात सुरू होतं, पण गोवा सरकारनेही चित्रिकरणावर बंदी घातली. त्यामुळे गोव्यात सुरू असणाऱ्या मालिकांच शूटिंग पुन्हा ठप्प झालं आहे.

कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती

मोहन जोशीं कोरोना संक्रमित झाले याचा खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे. अनेक कलाकारांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेकांनी या व्हायरसला यशस्वी परतवूनही लावलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Marathi entertainment