Home /News /entertainment /

पाहा मजेशीर Video; स्वामींचं नाव घेत अंकिता लोखंडेनं घेतली कोरोना लस

पाहा मजेशीर Video; स्वामींचं नाव घेत अंकिता लोखंडेनं घेतली कोरोना लस

अंकिताने (Ankita Lokhande)नुकताचा कोरोना लशीचा पहिला डोस(first dose of corona vaccine) घेतला आहे. त्याचाच हा व्हिडीओ(video) आहे.

  मुंबई, 8 मे- छोट्या पडद्यावरील (Tv Actress) लाडकी सून अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) सतत चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असते. चाहतेसुद्धा तिला भरभरून दाद देतात. नुकताच अंकिताने असाच आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) शेयर केला आहे. अंकिताने नुकताचा कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचाच हा व्हिडीओ आहे.
  इंजेक्शन बघून अंकिता घाबरलेली दिसत आहे. आणि घाबरून एखाद्या लहान मुलासारख मजेशीर रडताना दिसत आहे. इतकचं नव्हे तर लस घेताना अंकिता स्वामींना सुद्धा आठवत आहे. स्वामींचं नाव घेत तिनं हा पहिला डोस पूर्ण केला आहे.
  अंकिता सतत आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच अंकिताने एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं कोरोनाचा पहिला डोस घेतलेला आहे. अंकिताने चाहत्यांना सुद्धा लस घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र लस घेताना अंकिता खूपच घाबरली होती. ती सतत सतत तोंडात स्वामींचं नाव घेत होती. आणि स्वतः ला धीर द्यायचा प्रयत्न करत होती. यावेळी डॉक्टर सुद्धा एखाद्या लहानमुलासारख अंकिताला समजावत होते. त्यानंतर मग अंकिता लस घेते. (हे वाचा:पतीला निरोप देताना अभिनेत्री झाली भावूक; दिव्यांकाला एअरपोर्टवरच कोसळलं रडू  ) असा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. चाहत्यांना सुद्धा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत पडत आहे. अंकिताला एखाद्या लहान मुलाच्या रुपात पाहून चाहत्यांना सुद्धा आपलं हसू थांबवता आलं नाही. चाहते हा व्हिडीओ खुपचं एन्जॉय करत आहेत. आणि अंकिताला भरभरून कमेंट्स सुद्धा करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ankita lokhande, Corona vaccine, Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या