जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / BREAKING: कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती

BREAKING: कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती

BREAKING: कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती

Kangana Ranaut Tested COVID-19 Positive: अभिनेत्री कंगना रणौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मे: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा (Coronavirus in Bollywood) अधिकच घट्ट होऊ लागला आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने (Actress Kangana Ranaut says she has tested positive for COVID-19) याबाबत स्वत: माहिती दिली आहे.

जाहिरात

बॉलिवूडमध्ये अनेकजण कोरोनाशी  दोन हात करत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान आता अभिनेत्री कंगना रणौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तिचे चाहते सोशल मीडियावर कंगनासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या ट्विटरपासून दूर असणाऱ्या कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.  तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.’

कंगनाने पुढे असं म्हटलं आहे की, ‘मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला काही कल्पनाच नाही  आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. चला या कोविड-19 चा विनाश करूया, हा काही नाही आहे फक्त एक ठराविक काळाकरता आलेला ताप आहे ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि काही लोकांना तो मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात