मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी....” ; मराठी अभिनेत्याची शाहरूखसंबंधी ती पोस्ट चर्चेत

“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी....” ; मराठी अभिनेत्याची शाहरूखसंबंधी ती पोस्ट चर्चेत

क्रुझ पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लेक आर्यन खानला (aryan khan) अटक झाल्यापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. याप्रकरणावरूनच एका लोकप्रिय अशा अभिन्याने शाहरूखसाठी एक पोस्टा लिहिली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

क्रुझ पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लेक आर्यन खानला (aryan khan) अटक झाल्यापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. याप्रकरणावरूनच एका लोकप्रिय अशा अभिन्याने शाहरूखसाठी एक पोस्टा लिहिली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

क्रुझ पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लेक आर्यन खानला (aryan khan) अटक झाल्यापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. याप्रकरणावरूनच एका लोकप्रिय अशा अभिन्याने शाहरूखसाठी एक पोस्टा लिहिली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 28 ऑक्टोबर : क्रुझ पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लेक आर्यन खानला (aryan khan) अटक झाल्यापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सध्या या प्रकरणाला नवीन वळण लागलं असून रोज याप्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. या संपूर्ण प्रकरणात हळूहळू का होईना मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. अशातचा एका मराठमोळ्या अभिनेत्याने (kiran mane) शाहरूख खानसाठी खास फेसबुक पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी नुकतीच शाहरुख खानच्या भावनांबाबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी असंल तर कायद्यानं त्याला काय शिक्षा होईल ती भोगावी लागंल…पर्याय नाय. पन त्यो जर निर्दोष आसंल तर कुनाच्या बापाचा बाप बी त्याला शिक्षा करू शकत नाय ! कायद्यापेक्षा मोठ्ठा मानूस पैदा झाला नाय या देशात अजून… पन नशिबाशी चाललेल्या या लढाईत तू जो संयम ठेवलायस तो पाहून तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या. तू मिडीयाफुडं यिवून घसा फाडून सोत्ताची बाजु मांडायचा धसमुसळेपना केला नाय… कुठल्या राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या वळचनीला जाऊन पोराच्या सुटकेची भिक मागीतली नाय.. या देशातल्या कुठल्याबी अधिकार्‍याचं डोळं पांढरं होत्याल एवढा पैसा चारून तू आत्तापर्यन्त पोराला बाहेर काढू शकला असतास.. पन तू ते नाय केलंस ! तू लाच दिली असतीस तर पयल्याच सुनावनीला तो बाहेर असता.. तू तारीख पे तारीख सहन करत वाट पहातोयस… कारन तुझा या देशातल्या ‘कायद्या’ वर विश्वास हाय !

आपलं पोटचं पोर असल्या आरोपात अडकनं आनि आपन काहीच न करू शकनं याचं दु:ख – याची वेदना काय असते, ती ओळखायला आपन स्वत: मोठ्या मनाचा ‘बाप’ असनं गरजेचं असतं ! कद्रू मनाची बांडगुळं मनाला यिल ती टीका करत्यात ती ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असत्याल… तू एकांतात हतबल होऊन रडतही असशील… पन तू बादशाह हायेस भावा… किंग खान हायेस… ते तू दाखवून देनार !! आमचा तुझ्यावर विश्वास आहे… जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीनं सामोरा जाशील !!!

वाचा : वरुण धवनची पत्नी नताशा दलाल आहे प्रेग्नेंट?करवाचौथच्या 'या' फोटोने वाढवली....

लढ भावा लढ.. तू लढवय्या हायेस.. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करनार्‍यांची थोबाडं ठेचली जानार आहेत… त्यावेळीबी तू ‘माज’ करनार नाहीस याची खात्रीय आमाला… कारन तू खर्‍या अर्थानं ‘शाह’-रूख आहेस.. राजा आहेस.. हार कर जीतने वाला ‘बाजीगर’ आहेस ! लब्यू दोस्ता – अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

वाचा : शिल्पा शेट्टीने फॅशन नव्हे तर या कारणासाठी केलं आहे मुंडन! पती राज कुंद्राशी...

अभिनेता किरण माने सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असतात. विशेष करून फेसबुकवर ते विविध विषयावर मत मांडताना, लिहिताना दिसतात.सोशल मीडियावर मात्र सध्या त्यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Sharukh khan