• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शिल्पा शेट्टीने फॅशन नव्हे तर या कारणासाठी केलं आहे मुंडन! पती राज कुंद्राशी आहे याचा संबंध

शिल्पा शेट्टीने फॅशन नव्हे तर या कारणासाठी केलं आहे मुंडन! पती राज कुंद्राशी आहे याचा संबंध

राज कुंद्राला अलीकडेच एका अश्लील चित्रफीत तयार करणे आणि इंटरनेटवर अपलोड करण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 • Share this:
  मुंबई,28ऑक्टोबर- बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही काळात खूपच काही घडलं आहे. तिचा पती राज कुंद्रा(Raj Kundra Case) पॉर्न प्रोडक्शन प्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर ही अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर राहिली होती. पण काही दिवसांनंतर शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट करून तिचं वक्तव्य केलं होतं. आणि त्यांनतर ती पुन्हा तिच्या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसून आली होती. पतीला जामीन मिळण्याच्या काही दिवस आधी शिल्पा मैत्रिणीसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली होती. अभिनेत्रीदेखील तिचे केस अंडरकट करताना दिसली होती. पण आता बातमी समोर येत आहे की, शिल्पा शेट्टीने केलेला अंडर कट (New Hair Cut) हा कोणत्याही फॅशनमुळे नाही. तर शिल्पाने नवऱ्यासाठी मागितलेल्या नवसामुळे केला आहे.
  पिंकविलाच्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने वैष्णोदेवीला जाऊन नवस मागितला होता, की जर तिचा पती राज कुंद्राला पॉर्न प्रोडक्शन प्रकरणात जामीन मिळाला. तर ती आपले अर्धे डोके मुंडन करेल. अलीकडेच शिल्पा शेट्टीने तिचा अंडरकट शो करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा जिममध्ये केस बांधताना दिसली होती. ज्यामध्ये तिचा अंडरकटही स्पष्टपणे दिसत होता.यानंतर शिल्पा शेट्टीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती आपले अर्धे डोके मुंडवताना दिसत आहे.
  अलिबागमध्ये आहे कुंद्रा कुटुंब- सध्या संपूर्ण कुंद्रा कुटुंब अलिबागमध्ये आहे. आणि शिल्पा शेट्टीनेही तिचा करवा चौथ अलिबागमध्येच साजरा केला आहे. वास्तविक, शिल्पा शेट्टी दरवर्षी करवा चौथचा सण अनिल कपूरच्या घरी साजरा करताना दिसते. पण गेल्या अनेक वर्षांत शिल्पाने एकट्याने करवा चौथ साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे पती राज कुंद्राची जामिनावर सुटका झाल्यानंतरही शिल्पा पतीसोबत दिसत नाही. शिल्पाने तिचा मुलगा विवान आणि मुलीसोबतच गणेश विसर्जनाचा विधीही पार पाडला.त्याचवेळी नवरात्रीच्या पूजेदरम्यान शिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती फक्त तिच्या मुलांसोबत दिसत होती. राज कुंद्रा प्रकरण- राज कुंद्राला अलीकडेच एका अश्लील चित्रफीत तयार करणे आणि इंटरनेटवर अपलोड करण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याच्या बहाण्याने महिला आणि तरुणांना अश्लील आणि अश्लीलतेकडे ढकलणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन पुरुष कलाकार, लाइटमन म्हणून काम करणारा एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. जो व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो.
  Published by:Aiman Desai
  First published: