जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / म्हणून साकारली ‘राधे’त दगडू दादाची भूमिका; चाहत्यांच्या नाराजीवर तरडे यांचा मोठा खुलासा

म्हणून साकारली ‘राधे’त दगडू दादाची भूमिका; चाहत्यांच्या नाराजीवर तरडे यांचा मोठा खुलासा

म्हणून साकारली ‘राधे’त दगडू दादाची भूमिका; चाहत्यांच्या नाराजीवर तरडे यांचा मोठा खुलासा

प्रवीण यांनी ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) या चित्रपटात दगडू दादाची (Dagadu Dada) एक छोटीशी भूमिका साकारली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 29 मे- मराठी चित्रपट (Marathi Films) आणि नाट्यक्षेत्रातील एक उत्कृष्ट अभिनेता (Actor), देऊळबंद (Deulband) आणि मुळशी पॅटर्नसारख्या (Mulshi Pattern) चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) अशी ओळख असलेल्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) या चित्रपटात दगडू दादाची (Dagadu Dada) एक छोटीशी भूमिका साकारल्यानं त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज झाले आहेत. हा चित्रपट का केला आणि एवढी छोटी भूमिका का केली असा प्रश्न चाहते त्यांना विचारत आहेत. यावर हिंदीत व्यावसायिक चित्रपट कारायचा म्हणून नव्हे तर सलमान खानसोबत चांगले संबंध निर्माण करायचे असल्यानं ही भूमिका स्वीकारल्याचं तरडे यांनी म्हटलं आहे. ‘मला मसाला चित्रपट आवडत नाहीत. मला ते पहायलाही आवडत नाहीत आणि करायलाही आवडत नाहीत; पण चित्रपट हे असं माध्यम आहे ज्याद्वारे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळू शकेल, असा माझा विश्वास आहे. त्यामुळं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या चित्रपटाद्वारे एखाद्या विषयाला वाचा फुटत असेल तर त्याहून चांगलं काहीही नाही. आजचं वास्तव काय आहे आणि ते चित्रपटात कसं दाखवता येतं हे मराठी चित्रपटांमधून शिकता येतं. हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत नेहमीच उजवे असतात,’ असं मत तरडे यांनी यावेळी व्यक्त केलं.

    जाहिरात

    राधेमध्ये दगडू दादा या भूमिकेवरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना तरडे म्हणाले की, ‘राधे पाहून माझे चाहते अस्वस्थ झाले. एवढी छोटी भूमिका मी का केली? असा सवाल त्यांनी मला केला. मी त्यांना सांगू इच्छितो की, छोट्या छोट्या भूमिका केल्यावरच मी इथपर्यंत पोचलो आहे. भूमिकेच्या लांबीनं मला काही फरक पडत नाही. मी हे काही खास कारणांसाठी करत आहे. मला सलमान भाईंशी संबंध वाढवायचे होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. एक माणूस म्हणून मला ते आवडतात. एखादा व्यावसायिक चित्रपट माझ्याकडून गेला तर मी त्याला इतकं प्राधान्य देत नाही.’ (हे वाचा: VIDEO’जिंकलस मित्रा’ रोहित राऊतच्या ‘आली ठुमकत’ गाण्यावर चाहत्यांच्या कडक कमेंट   ) ‘राधे’मध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कामातील फरक याबद्दलही तरडे यांनी आपलं मत मांडले. ‘मराठी चित्रपटांचे बजेट मोठं नसतं. मुळशी पॅटर्न चित्रपट मी सात वर्षानंतर बनवला कारण त्याला कोणी निर्माताच मिळत नव्हता. मी इंडस्ट्रीमध्ये पैशासाठी धावत होतो. लव्ह स्टोरीज, फॅमिली ड्रामा आणि कॉमेडी याला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. माझ्या चित्रपटातील शेतकऱ्यांचं आयुष्य, गँग वॉर यात निर्मात्यांना मनोरंजन दिसत नाही. तेच जेव्हा मी राधेच्या सेटवर पोहोचलो आणि तिथली भव्यता, तंत्रज्ञ या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा आश्चर्यचकित झालो. आम्हाला एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये 15 कलाकार घालण्याची सवय आहे. राधेच्या सेटवर, 10 व्हॅनिटी व्हॅन्स होत्या. सलमान खान आणि प्रभुदेवा यांच्यामुळे या चित्रपटात मोठी गुंतवणूक झाली. तिथलं हे ग्लॅमर पाहून मला आनंद झाला. त्यांनी 2 ते 3 दिवस केलेले एक दृश्य, मी मुळशी पॅटर्नमध्ये 3 ते 4 तासात केलं आहे. हिंदीमध्ये स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाच्या नावावर चित्रपट चालतात. मराठीत आशय हाच हिरो असतो, असं तरडे यांनी सांगितलं. तरडे यांचा शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरील गाजलेला चित्रपट, ‘मुळशी पॅटर्न’ हिंदीमध्ये ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ (Antim : The Final Truth) या नावानं येत आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी याचं दिग्दर्शन केलं असून, यामध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या हिंदी चित्रपटापासून तरडे मात्र दूरच आहेत. (हे वाचा: ‘बिग बॉस 15’ ची प्रतीक्षा लवकरच संपणार, ‘या’ स्पर्धकांचा असणार समावेश ) याबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकांनी बॉलिवूडचा रिमेक पाहण्यापूर्वी एकदा मराठीतील मुळशी पॅटर्न चित्रपट पहावा. हिंदीत त्याचं पूर्ण व्यावसायिकरण होतं, शैलीही बदलली जाते. मी हा चित्रपट करत नसल्यानं त्यात नेमके काय बदल केले आहेत, हे मला माहिती नाही. काही व्यावसायिक बदल केले गेले आहेत, याची मला कल्पना आहे. काही दृश्य अतिशय वेगवान घेण्यात आली आहेत. मुळशी पॅटर्नला तांत्रिकतेची गरज नाही. त्याचा आशयच मजबूत आहे. हिंदी रिमेक चालला तर, माझ्या मातीतला मी निवडलेला विषय देशभरात पोहोचल्याचा मला आनंदच होईल. मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. हिंदी चित्रपटसृष्टी मराठीतला विषय जगासमोर आणत आहे हा फार मोठा सन्मान आहे.’ दरम्यान, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या पदार्पणाबाबत मात्र तरडे यांनी काहीही सांगितलं नाही. सध्या याबाबत काही जणांशी चर्चा सुरू आहे; पण अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात