जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दिगंबर नाईकला केलंय 'या' बाईनं हैराण; अभिनेत्यावर आली 'बाई वाड्यातून जा' म्हणायची वेळ

दिगंबर नाईकला केलंय 'या' बाईनं हैराण; अभिनेत्यावर आली 'बाई वाड्यातून जा' म्हणायची वेळ

digambar naik and sonali patil

digambar naik and sonali patil

आपल्या मस्त मालवणी भाषेत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते दिगंबर नाईक यांच्या मागे नेमकं कोण लागलंय? अभिनेत्यानं केलाय खुलासा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च :  आपल्या विनोदी टायमिंगने  रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे. ऐरवी बाई वाड्यावर या निळू फुलेंचा डायलॉग मोठ्या हुशारीनं मारला जातो. पण या बाईमुळे अभिनेते दिगंबर नाईक यांच्यावर बाई वाड्यातून जा असं म्हणायची वेळ आली आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही बाई  नेमकी कोण? असा प्रश्न समोर आला. हे पाहायचं असेल तर बाई वाड्यावर या हे रंगभूमीवर आलेलं नवकोर नाटक पाहावं लागेल.  या नाटकातून बिग बॉस फेम अभिनेत्री देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या मस्त मालवणी भाषेत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते दिगंबर नाईक रगंभूमीवर धम्माल आणताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे बिगबॉस फेम  अभिनेत्री सोनाली पाटील देखील या नाटकाच महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  ‘बाई वाड्यातून जा’ हे धमाल विनोदी नाटक येत्या बुधवारी म्हणजेच 29 मार्च प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोनालीचं हे दुसरं नाटक असणार आहे. याआधी साखर खाल्लेला माणूस या नाटकात काम करत होती. सोनालीला पुन्हा रंगभूमीवर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. त्याचप्रमाणे दिगंबर नाईकबरोबर सोनाली काय धम्माल करणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हेही वाचा - वडील गेल्यानंतर 16 दिवसांनी आईचाही मृत्यू; आई कुठे काय करतेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर बाई वाड्यातून जा या नाटकाचा प्रयोग 29 मार्चला अत्रे  रंगमंदिर कल्याण येथे  शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे.  नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि  बिगबॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजीत सावंतफुले आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

जाहिरात

तब्बल चार वर्षांनी ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेल्या दिगंबर नाईक यांनी म्हटलंय, “पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी समजलेला असतो तसंच हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास आहे”.

News18लोकमत
News18लोकमत

तीन वेगळ्या जॉनरची गाणी या नाटकात असून गायक अश्मिक पाटील ,कविता राम यांचा स्वराज गाण्यांना लाभला आहे. संगीत सुशील कांबळे यांचे आहे.नाटकाची जाहिरात संकल्पना संजय खापरे यांनी सांभाळली आहे. नेपथ्य वैभव पिसाट तर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची आहे. नेपथ्य निर्माण महेश धालवलकर यांचे आहे. रंगमंच व्यवस्था सचिन सावंत तर व्यवस्थापन जयेश निकम ह्यांचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात