मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विक्रम गोखलेंचे नाव न घेता अतुल कुलकर्णींचा निशाणा ; दोन शब्दाचं ट्वीट चर्चेत

विक्रम गोखलेंचे नाव न घेता अतुल कुलकर्णींचा निशाणा ; दोन शब्दाचं ट्वीट चर्चेत

विक्रम गोखले यांनी कंगना राणवतच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. आता यानंतर अभिनेतो अतुल कुलकर्णी यांनी (Vikram Gokhle) ट्वीटरवरून विक्रम गोखले यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

  मुंबई, 15 नोव्हेंबर : बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणावतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्यावरून केलेल्या विधानावरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्या वाक्याचे अभिनेता विक्रम गोखले यांनी (Vikram Gokhle) समर्थन केल्याने परत या वादात भर पडली आहे. त्याला आता अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी (Atul Kulkarni) देखील ट्वीट करत नाव न घेता विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. अतुल कुलकर्णी यांनी ट्विट करून नाव न घेता विक्रम गोखले (Atul Kulkarni) यांना जोरदार टोला लगावला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, वयाचा आणि शहानपणाचा दुरान्वये संबंध नसतो. सध्या सोशल मीडियावर अतुल कुलकर्णी यांचे हे दोन शब्दाचे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. विक्रम गोखले नेमके काय म्हणाले होते? भिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने काल, पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणावतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला. वाचा : 'या' मराठी सेलिब्रिटी कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याच आगमन यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत. यावरून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा : 'लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं?' आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अभिनेत्री वादात कंगना नेमकी काय म्हणाली होती भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाले, असं कंगना रणावत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने, नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या