जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं होतं?' आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

'लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं होतं?' आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

'लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं होतं?' आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

इतकच नाही तर अभिनेत्रीवर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 15 नोव्हेंबर : राजकारण, समाजकारण, एखाद्या व्यक्तीचं खासगी आयुष्य आदी विषयांवर आक्षेपार्ह टिप्पणी करून चर्चेत येणं हे आता नित्याचं झालं आहे. काही सेलिब्रिटी तर बेताल वक्तव्य आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वादामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या कन्नड अभिनेत्री रचिता राम (Kannada Actress Rachita Ram) तिच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे (Controversial Comment) चर्चेत आहे. या अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादांना तोंड फुटलं आहे. अभिनेत्री रचिता राम हिनं तिच्या `लव्ह यू रच्चू` या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) बेताल वक्तव्य केलं असून, तिने त्यासाठी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने तर तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबतचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे. कन्नड अभिनेत्री रचिता राम सध्या `लव्ह यू रच्चू` या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं विशेष चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत चित्रपटातील बोल्ड सीनच्या (Bold Scene) अनुषंगाने पत्रकारांनी काही प्रश्न तिला विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना रचितानं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. हे ही वाचा- बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना `डिंपल क्वीन` या नावानं परिचित असलेल्या अभिनेत्री रचिता रामला एका पत्रकाराने चित्रपटातल्या बोल्ड सीनबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर रचितानं ‘येथील बहुतांश नागरिक विवाहित आहेत. तुम्हाला लाजवण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला तुम्हाला फक्त हेच विचारायचं आहे की लग्नानंतर लोक काय करतात,` असा प्रतिप्रश्न केला; मात्र यावर कोणी उत्तर देण्यापूर्वीच रचितानं स्वतः याचं उत्तर देताना सांगितलं की `ते रोमान्सच करत असतील ना, चित्रपटात हेच दाखवलं गेलं आहे.` तिच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता जोरदार वाद निर्माण झाला आहे. `बोल्ड सीन ही या चित्रपटाच्या कथानकाची गरज होती,` असंही रचितानं स्पष्ट केलं आहे.

    जाहिरात

    या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी, अभिनेत्री रचिता राम हिनं माफी मागावी अशी मागणी कन्नड क्रांती दलानं केली आहे. रचितावर बंदी घालण्याची मागणी कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने (Karnataka Film Chamber Of Commerce) केली आहे. `रचिता राम हिचं वक्तव्य संस्कृतीच्या विरुद्ध आहे. अशा वक्तव्यामुळे राज्याची प्रतिमा खराब होत आहे,` अशी प्रतिक्रिया कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तेजस्वी नागलिंगस्वामी यांनी व्यक्त केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात