Home /News /entertainment /

कौतुकास्पद ! बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे

कौतुकास्पद ! बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठरेचा (Adinath Kothare) 24 डिसेंबरला बॉलीवूडमध्ये डेब्यू होत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर ह्यांच्या भूमिकेत आदिनाथ आपला अभिनयाचा ठसा उमटवताना दिसणार आहे.

  मुंबई, 18 डिसेंबर - मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा आदिनाथ कोठरे (Adinath Kothare) 24 डिसेंबरला बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर ह्यांच्या भूमिकेत आदिनाथ आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. आदिनाथ कोठारे पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आहे. ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे. ही गोष्ट नक्कीच सर्वांसाठी अभिमानाची तर आहेच पण कौतुकास्पद देखील आहे. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आदिनाथ म्हणतो, “मी आत्ता खूप भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. '83' चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटूंबाला–चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे. (वाचा-Bigg Boss Marathi : हा सदस्य ठरला बिग बॉस मराठीचा पहिला फायनलिस्ट!_) 2021 हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी करिअरच्या दृष्टीने अविस्मरणीयच वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. कारण यंदा आदिनाथला पाणी चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावर्षी आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेबसीरिजव्दारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला. वाचा-अभिजित बिचुकलेचा नवा ड्रामा; देवोलिनाकडे Kiss मागितल्यानंतर आता करायचंय सुसाईड आदिनाथने माझा छकुला या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात एका बालकलाकाराच्या भूमिकेत तो झळकला होता. त्यानंतर त्याने त्याचे वडील महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. झपाटलेला २, सतरंगी रे यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे.
  '83' हा 1983च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण यांच्यासोबत आदिनाथही झळकणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Marathi entertainment, Ranveer singh

  पुढील बातम्या