Home /News /entertainment /

Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेचा नवा ड्रामा; देवोलिनाकडे Kiss मागितल्यानंतर आता करायचंय सुसाईड

Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेचा नवा ड्रामा; देवोलिनाकडे Kiss मागितल्यानंतर आता करायचंय सुसाईड

'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये दररोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहेत. घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून घरात वादळ निर्माण झालं आहे. सतत स्पर्धकांमध्ये टोकाचे वाद होताना दिसत आहेत.

  मुंबई, 18 डिसेंबर-  'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये दररोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहेत. घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून घरात वादळ निर्माण झालं आहे. सतत स्पर्धकांमध्ये टोकाचे वाद होताना दिसत आहेत. दरम्यान देवोलिना  (Devoleena Bhattacharjee)  आणि अभिजित बिचकुलेचा विषय फारच चर्चेत आला होता.अभिजित बिचकुलेच्या   (Abhijit Bichukale)  वागणुकीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांनतर बिचकुलेने आता एक नवा राडा घातला आहे जे पाहून सर्वच चकित झाले आहेत. बिग बॉस १५ च्या घरात एका टास्क दरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचं कारण अभिजित बिचकुले होता. त्यानं देवोलिना भट्टाचार्जीकडे किस मागितलं होतं. आणि अभिनेत्रीने आपल्याला त्यासाठी ब्लॅकमेल केल्याचंही म्हटलं होतं. या सर्व प्रकारानंतर घरातील सदस्य अभिजित बिचकुलेवर भडकले आहेत. त्यांनी त्याला बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. अशाने अभिजित बिचकुले घरामध्ये एकटा पडत आहे. दरम्यान त्यानं निशांत भट्टकडे येत बाथरूममध्ये कोणता कलर आहे का? आपल्याला ते खायचं आहे अर्थातच सुसाईड करायचं असल्याचं म्हटलं आहे. जे घरामध्ये होत आहे आपण त्याला वैतागलं असल्याचं तो म्हणतो.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  अभिजित बिचकुलेचं हे बोलणं ऐकून निशांत थक्क होतो. तो ही गोष्ट रश्मि देसाई आणि शमिता शेट्टीसोबत शेअर करतो. त्यांनाही हे ऐकून धक्का बसतो. त्यांनतर प्रतीक सेहेजपाल अभिजित बिचकुलेकडे जाऊन त्याला समजवायचा प्रयत्न करत आहे. (हे वाचा:सलमान खाननं रेंटवर दिलं वांद्रयातील अपार्टमेंट! महिन्याला घेणार इतकं भाडं ) नेमकं काय घडलं होतं- 'तिकीट टू फिनाले' च्या टास्क दरम्यान घरात धक्कादायक प्रकार घडला होता. अभिजित बिचकुले देवोलीनाच्या (Devoleena Bhattacharjee) गालांना जबरदस्ती हात लावून 'कब तू मुझे किस करेगी? असा प्रश्न विचारताना दिसला होता. अभिजीतच्या या घाणेरड्या कृतीमुळं देवोलीना संतापून जाते आणि त्याला रागात ओरडू लागते. 'जर तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल. तू तुझी मर्यादा ओलांडू नकोस' अशी धमकी ती अभिजितला देते. देवोलीनानं घरातील सर्व लोकांसमोर खरडपट्टी काढल्यानंतर अभिजीत आपण तर चेष्टा करत होतो. असं स्पष्टीकरण देतो. मात्र घरातील सर्व लोक त्याच्यावर संतापले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या