मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'वाईट गोष्टी संपून आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत' ; सोनली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

'वाईट गोष्टी संपून आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत' ; सोनली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

अप्सरा फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  (sonalee kulkarni) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. आता तिने कोरोना काळाविषयी भाष्य करणारं एक पोस्ट केली आहे

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर- अप्सरा फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  (sonalee kulkarni) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. गेल्या काही काळात ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. आता तिने कोरोना काळाविषयी भाष्य करणारं एक पोस्ट केली आहे. यामध्ये सोनालीने कोरोना काळातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सोनालीने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, "Looking at you 19th November!!! १८ महिन्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात आपला सिनेमा प्रदर्शित होणारे….हे पुन्हा एकदा स्वप्नपूर्ती सारखं वाटतंय..लहानपणापासून मोठ्या पडद्याची ओढ होती…त्याच्यावर झळकण्याची संधी १२ वर्षं सलग मिळाली…Pandemic मुळे आपण सगळ्यांनीच अतिशय वाईट दिवस पाहिले, हा मोठा पडदा ही त्याला अपवाद नाही…पण या अश्या वाईट गोष्टी संपाव्यात आणि आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत म्हणून आपण “झिम्मा” हा खेळ खेळतो. आम्ही तो खेळायला सज्ज झालोय, १९ नोव्हेंबर पासून, तुम्ही पण या. सामील व्हा."

कोरोना काळात बंद झालेला मोठा पडदा पुन्हा उघडतोय. सोनाली कुलकर्णी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काही दिवसातच ‘झिम्मा’ हा मराठी सिनेमा चित्रपटगृहांत झळकणार आहे. अनेक नायिकांसोबत सोनालीही 'झिम्मा'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनालीने या सिनेमात मैथिलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. साखरपुडा आणि लग्न या कालावधीमधील द्विधा मनस्थितीत असलेली मुलगी तिने या सिनेमात साकारली आहे.

वाचा : थुकरट वाडीत हजेरी लावणार बॉलिवूडमधील हे क्यूट कपल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 7 मे रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.

वाचा :मानसी नाईकचा पतीसोबतचा तो फोटो पाहून चाहता म्हणतोय, 'गुड न्यूज कधी...'

कोरोनानंतर आता हळूहळू सगळं सुरळीत झालं आहे. सिनेमागृह असतील मंदिर असतील सरकारने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला होता. आता मात्र सर्व पूर्णपथावर आलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sonalee Kulkarni, Sonali kulkarni