जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मानसी नाईकचा पतीसोबतचा तो फोटो पाहून चाहता म्हणतोय, 'गुड न्यूज कधी....'

मानसी नाईकचा पतीसोबतचा तो फोटो पाहून चाहता म्हणतोय, 'गुड न्यूज कधी....'

मानसी नाईकचा पतीसोबतचा तो फोटो पाहून चाहता म्हणतोय, 'गुड न्यूज कधी....'

मानसी नाईकच्या पतीचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिनं पतीसोबत खास फोटो शेअर एक पोस्ट केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 नोव्हेंबर- बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. नवरा प्रदीप खरेरा याच्यासोबतचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मानसी नाईकच्या पतीचा **( pradip kharera)**आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिनं पतीसोबत खास फोटो  (pradip kharera birthday ) शेअर एक पोस्ट केली आहे. मानसीच्या या पोस्टला एका चाहत्याने भन्नाट कमेंट केली आहे. मानसी नाईकने पती प्रदीप खरेरासोबतचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की,तोहफे में दिल दे दूं, या चांद सितारे,जन्मदिन पे क्या दूं,सारी जिंदगी तेरे नाम लिख दूं।जन्मदिन मुबारक हो प्यारे पतिदेव ❤️@pardeepkharera1 Happy birthday Jaan. तिच्या या पोस्ट चाहत्यापांसून ते कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये एका चाहत्याची कमेंट लक्षवेधी ठरत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्याने म्हटलं मग गुड न्यूज कधी…आता मानसी यावर काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वाचा :  ‘कंगनाला पाठिंबा महामूर्खपणा, विक्रम गोखलेंबरोबर काम..’; निर्मात्याचा निर्णय मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. दोघेही सोशल मीडियावर विविध फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

जाहिरात

मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात