मुंबई, 19 मे: बहुचर्चित ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) चा ट्रेलर (Trailer) नुकताचं रिलीज झाला आहे. अनेक दिवसांपासून चाहत्यांना याची प्रतीक्षा होती. त्यामुळे ट्रेलर पाहून चाहते सुखावले आहेत. मात्र ट्रेलरबद्दल अजून एक विशेष बाब समोर आली आहे, ती म्हणजे या ट्रेलरमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याने सहा महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा (Asif Basra) असं या अभिनेत्याचं नाव आहे. त्यांना बघून चाहत्यांना सुद्धा गहिवरून आलं आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन 2’ या सिरीजची चाहत्यांना खूप दिवसांपासून उत्सुकता लागलेली होती. या सिरीजचा पहिला भाग सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आता दुसरा भाग सुद्धा चाहत्यांच्या भेटीस येत आहे. तत्पूर्वी त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलर रिलीज होताचं सर्वांचं लक्ष वेधलं ते, म्हणजे अभिनेता आसिफ बसरा यांनी. कारण आसिफ यांनी 6 महिन्यांपूर्वीचं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या निधनानंतर त्याची ही झलक पाहून चाहते सुद्धा भावुक झाले आहेत. (हे वाचा: कौतुकास्पद! ‘हा’ मराठी अभिनेता लग्न रद्द करून,होणाऱ्या पत्नीसोबत करतोय रुग्णसेवा ) आश्चर्यची गोष्ट म्हणजे, आसिफ बसरा यांनी आपल्या कुत्र्याच्या पट्याने गळफास लावून घेतला होता. आसिफ हे आपल्या एका विदेशी मैत्रिणीसोबत राहत होते. त्यांच्या या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र पोलिसांनी प्राथमिक अंदाज दर्शवत, कदाचित आसिफ हे डिप्रेशनशी लढा देत होते, असं म्हटलं होतं. (हे वाचा: अखेर तारीख ठरली! मनोज वायपेयीच्या ‘द फॅमिली मॅन-2’ चा ट्रेलर रिलीज ) आसिफ यांनी आपल्या कारकिर्दीत कॉमेडी ते खलनायक अशा भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील क्रिश 3, जब वी मेट, हिचकी, कालाकांडी अशा चित्रपटांत काम केलं आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ हा त्यांचा शेवटचाच प्रोजेक्ट ठरला.